पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज दरवाढीविरुद्ध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST2021-02-06T04:34:40+5:302021-02-06T04:34:40+5:30
लातूर : इंधन दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी लातूर शहरात शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवारी दुपारी ...

पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज दरवाढीविरुद्ध आंदोलन
लातूर : इंधन दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी लातूर शहरात शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत दरवाढीचा निषेध करण्यात आला.
आंदोलनात जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, महिला संघटक सुनीता चाळक, माजी जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी, विष्णू साबदे, शंकर रांजणकर, महानगर प्रमुख विष्णुपंत साठे, शहरप्रमुख रमेश माळी, ॲड. वैभव बिराजदार, कुलदीप सूर्यवंशी, त्र्यंबक स्वामी, अमर बुरबुरे, नरेश कुलकर्णी, राहुल रोडे, बसवराज मंगरुळे, एस.आर. चौहान, तानाजी करपुरे, सी.के. मुरळीकर, योगेश स्वामी, पवन जोशी, माधव कलमुकले, सुधीर केंद्रे, सुनील फुलारी, राजू कतारे, खंडू जगताप, भास्कर माने, सुधाकर कुलकर्णी, शिवराज मुळावकर, प्रदीप बनसोडे, आकाश मसाने, युवराज वंजारे, दिलीप सोनकांबळे, विजय थाडगे, स्वप्नील भोसले, दिलीप भांडेकर, लाला पाटील, अजय घोणे, श्रीमंत पौळ, कालिदास मेटे, ॲड. अशोक गुळभेले, गोविंद गिरी, बस्वराज दोसपल्लीकर, मुजीबभाई शेख, गोविंद माळी आदींसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
दरम्यान, जिल्हाभरातही ठिकठिकाणी शिवसेनेने निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध केला.
पेट्रोल ९४.३७, डिझेल ८३.५९ रुपयांवर
लातूर जिल्ह्यात पेट्रोल ९४.३७ रुपये लिटर तर डिझेल ८३.५९ रुपयांवर पोहोचले आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने सातत्याने पेट्रोल, डिझेलमध्ये दरवाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडून टाकल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभरातील आंदोलनात केला. दरम्यान, ग्रामीण भागातही शिवसेनेने ठिकठिकाणी आंदोलने केली.
महावितरणसमोर भाजपाचे टाळे ठोको
लातूर शहरात शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता महावितरण कार्यालयासमोर टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन झाले.
यावेळी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, शहराध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन सरचिटणीस मनीष बंडेवार, प्रवीण सावंत, शिरीष कुलकर्णी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.