शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला घास भरविणाऱ्या आईच्याच डाेक्यात काठी! मनाेवस्था बरी नसलेल्या मुलाकडून आईचा खून

By राजकुमार जोंधळे | Updated: February 21, 2024 21:55 IST

भांबावलेल्या मुलाने स्वत:ला काेंडून घेतले...

राजकुमार जाेंधळे / लातूर : मनाेवस्था बरी नसलेल्या ४५ वर्षीय मुलाने जेवणाचे ताट घेऊन खाेलीत आलेल्या आईच्याच डाेक्यात काठी घातली. तिथेच वयाेवृद्ध आईचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात मुलाविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अटक केलेल्या मुलाला पाेलिसांनी बुधवारी रुग्णालयात दाखल केले.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील वाल्मीकनगर येथील रहिवासी सुभाषचंद्र कंदले (वय ८५) हे पत्नी आणि मुलगा पूनमचंद्रसाेबत राहत आहेत. आई प्रभावती कंदले (वय ७९) मनाेवस्था बरी नसलेला मुलगा पूनमचंद्र कंदले (वय ४५) याच्या खाेलीत मंगळवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास गेली हाेती. दरम्यान, मुलाने वृद्ध आईच्या डाेक्यात काठी घातल्याने ती गंभीर जखमी अवस्थेत जागेवरच काेसळली. यातच तिचा मृत्यू झाला. बाहेर वडील अंथरुणावर पडून हाेते. बराच वेळ झाला, पत्नी खाेलीतून बाहेर का आली नाही? मुलाचाही आवाज येत नाही. यामुळे ते अस्वस्थ झाले. आवाज दिला तरी आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी विकास नगरात राहणाऱ्या दुसऱ्या मुलाला याची माहिती दिली.

मुलगा जयकुमार कंदले (वय ५०) हा तातडीने घरी दाखल झाला. त्याने भावाला आणि आईला दरवाजावर थाप मारून बाहेरून आवाज दिला. मात्र, खाेलीतून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. आराेपी मुलगा पूनमचंद्र याने खाेलीच्या दरवाजाची कडी आतून बंद केली हाेती. अखेर याबाबतची माहिती एमआयडीसी ठाण्याच्या पाेलिसांना देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पाेलिसांनी खाेलीचे दार उघडले. प्रभावती कंदले यांच्या मृतदेहाचा पंचनामा पाेलिसांनी केला. घटनास्थळी डीवायएसपी भागवत फुंदे, पाेलिस निरीक्षक एस.डी. नरवाडे, सपाेनि. देवकत्ते यांनी भेट दिली.

याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात जयकुमार कंदले (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गु.र.नं. १३० / २०२४ कलम ३०२ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाेलिसांनी आराेपी मुलगा पूनमचंद्र कंदले याला अटक केली आहे. त्याला बुधवारी लातुरातील रुग्णालयात दाखल केले आहे.

भांबावलेल्या मुलाने स्वत:ला काेंडून घेतले...

आईच्या डाेक्यात काठी घातल्यानंतर ती जागेवरच काेसळली. घडला प्रकार पाहून मनाेवस्था बरी नसलेला मुलगा भांबावून गेला. त्याने मृतावस्थेत असलेल्या आईसाेबत स्वत:लाही काेंडून घेतले. बराच वेळ दरवाजा उघडत नाही, पत्नी बाहेर येत नाही, मुलाचा आवाज येत नाही. हे पाहून वयाेवृद्ध वडिलांनी दुसऱ्या मुलाला बाेलावून घेतले. दरवाजा उघडला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी