शहरातील लेक्चर कॉलनी, टेंभुर्णी रोडवरील गणेश नगर, सैनिक काॅलनी येथे माकडांनी उच्छाद मांडला आहे. सकाळी व संध्याकाळच्या वेळी घराच्या संरक्षण भिंतीवर माकडे वावरत आहेत. घराचा दरवाजा उघडा दिसला की, अचानक घरात प्रवेश करून खाण्याची दिसेल ती वस्तू बिनधास्त घेऊन जातात. कोणी त्यास विरोध केला तर अंगावर येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बालकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. त्यामुळे माकडांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी डॉ. सतीश केंद्रे, मनोहर पाटील, गोविंदराव गिरी, मीनाक्षीताई शिंगडे, आर. जी. कांबळे, प्रवीण शिंगडे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर शरद कांगणे, प्रा. अनिल मुंडे, शिवराज शेळके, राघवेंद्र गादेवार, बाशिदखाॅ पठाण, रवी महाजन, गोविंदराव गिरी, महेश लोहारे, शिवकुमार उडगे, आर. जी. कांबळे, सुप्रिय बनसोडे, रमेश कांबळे, सुजित गायकवाड, पांडुरंग केंद्रे, गजानन नखाते, सिद्धेश्वर गुट्टे, अनुराधा केंद्रे, शिवगंगा गवळे, नितीन नारागुडे, जी. वाय. गायकवाड, वसंत तिडोळे, निरज लाटकर, जी. टी. घोगरे, बी. डी. शेकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.