मोबाईलची चोरी; अज्ञातावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:22 IST2021-08-15T04:22:09+5:302021-08-15T04:22:09+5:30

गौण खनिजाची चोरी; चौघांवर गुन्हा दाखल लातूर : गावालगत असलेल्या गायरानमधील जमीन खोदून गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक करून चोरी ...

Mobile theft; Crime on anonymity | मोबाईलची चोरी; अज्ञातावर गुन्हा

मोबाईलची चोरी; अज्ञातावर गुन्हा

गौण खनिजाची चोरी; चौघांवर गुन्हा दाखल

लातूर : गावालगत असलेल्या गायरानमधील जमीन खोदून गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक करून चोरी केल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील रूई उत्तर परिसरात घडली. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तलाठी नीळकंठ भगवानराव कराड (५२, रा. चिखली, ता. अहमदपूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, अहमदपूर तालुक्यातील रूई उत्तर गावालगत असलेल्या गायरानमध्ये खोदकाम करून जेसीबीच्या साहाय्याने गौण खनिज वाळू भरून अवैधरित्या ७० ब्रास (किंमत १ लाख ६८ हजार) चोरून नेली. याबाबत गणपत लिंबाजी होळकर (रा. चिलखा, ता. अहमदपूर), माधव कांबळे (रा. रूई उत्तर), गंगाधर कांबळे (रा. रूई उत्तर) आणि निवृत्ती कांबळे (रा. रूई उत्तर, ता. अहमदपूर) यांच्या विरोधात शुक्रवारी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० ते ११ ऑगस्ट या कालावधीत घडली. अधिक तपास पोहेकॉ. केंद्रे करीत आहेत.

उदगीर शहरातून मोटारसायकलची चोरी

लातूर : घरासमोरील रस्त्यावर थांबविलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी निडेबन वेस येथील विद्यानगर परिसरात घडली. याबाबत उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पांडुरंग रामा बिजले (५२, रा. विद्या नगर, निडेबन वेस उदगीर) यांनी आपल्या ताब्यातील मोटारसायकल (एमएच २४ एजे ०८०४) घरासमोर थांबवून जेवण करीत होते. दरम्यान, जेवण झाल्यानंतर बाहेर आले असता मोटारसायकल गायब झाल्याचे दिसून आले. यावेळी शोधाशोध केली असता मोटारसायकल आढळून आली नाही. याबाबत उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. पुठ्ठेवाड करीत आहेत.

शेतीच्या कारणावरून कुऱ्हाडीने मारहाण

लातूर : शेतातील रस्त्याच्या कारणावरून आणि मागील भांडणाची कुरापत काढून कुऱ्हाडीने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना थोरलेवाडी येथे शुक्रवारी घडली. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी किरण मोहन वलसे (३७, रा. थोरलेवाडी, ता. अहमदपूर) यांना शेतातील रस्त्याच्या कारणावरून, मागील भांडणाची कुरापत काढून हणमंत नरसन फुलमंटे (५३, रा. मावलगाव, ता. अहमदपूर) याच्यासह अन्य तिघांनी संगनमत करून डोक्यात कुऱ्हाडीने मारून जखमी केले. शिवाय, मुका मार दिला. भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या भावालाही काठीने मारून जखमी केले. ही घटना थोरलेवाडी येथे शुक्रवार १३ ऑगस्ट रोजी घडली. शिवाय, जिवे मारण्याची धमकी देण्यात आली, असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हणमंत फुलमंटे याच्यासह अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोउपनि. डक करीत आहेत.

बसमध्ये चढताना प्रवाशाचा मोबाईल लंपास

लातूर : बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशातील मोबाईल लंपास केल्याची घटना शुक्रवारी राजीव गांधी चौकात घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी श्रीनिवास मुरहरी पवार (४६, रा. प्रकाश नगर, लातूर) हे राजीव गांधी चौकातील थांब्यावरून बसमध्ये चढत होते. दरम्यान, गर्दीमध्ये अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाईल पळविला. ही घटना शुक्रवारी घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. चव्हाण करीत आहेत.

भरधाव टिप्पर विद्युत खांबाला धडकला

लातूर : भरधाव टिप्पर रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबाला धडकल्याची घटना उदगीर शहरातील नाईक चौक ते कौळखेड रोड या मार्गावर शुक्रवारी घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात टिप्पर चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, राजीव कोंडिबा भुजबळे (४२, रा. उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, टिप्पर चालकाने आपल्या ताब्यातील टिप्पर (एमएच १४-६९१४) हे हयगयी व निष्काळजीपणे चालवून लघुदाब वाहिनीच्या लोखंडी विद्युत खांबाला जोराची धडक दिली. यामध्ये लोखंडी खांबाचे जवळपास २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात टिप्पर चालकाविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Mobile theft; Crime on anonymity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.