शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात मंत्रिपद दोघांना? जिल्ह्यात सहापैकी पाच आमदार महायुतीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 12:44 IST

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काळातही राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री पदे लातूरला मिळाली आहेत.

लातूर : जिल्ह्यातील मतदारांनी भरघोस कौल देत सहापैकी पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून दिले आहेत. पूर्वानुभव, पक्षातील कारकीर्द लक्षात घेऊन जिल्ह्यात किमान दोघांची मंत्रिपदी वर्णी लागेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. महायुतीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या दोन्ही पक्षांमध्ये मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत.

काळजीवाहू सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणारे संजय बनसोडे हे उदगीरमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी अपेक्षा उदगीरकरांची आहे. पहिल्याच टर्ममध्ये ते आमदार, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीही झाले होते. सामाजिक समतोल साधण्यासाठी पक्षाकडून त्यांचे नाव पुन्हा पुढे येईल, अशी चर्चा आहे. भाजपाकडून माजी मंत्री आ. संभाजी पाटील - निलंगेकर यांचे नाव प्रथम क्रमांकावर चर्चेत आहे. ते मागील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. बनसोडे आणि निलंगेकर या दोन प्रमुख नावांशिवाय नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार झाला तर औसा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आ. अभिमन्यू पवार यांचे नाव भाजपाकडून पुढे येऊ शकते. तसेच लातूर ग्रामीणमधून आलेले भाजपाचे आ. रमेश कराड विधान परिषदेवर आमदार आहेत. आता ते विधानसभेवर निवडून आले असून, त्यांनी अटीतटीची लढाई जिंकली आहे. त्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्ते अपेक्षा व्यक्त करीत आहेत. अहमदपूरचे आ. बाबासाहेब पाटील हे सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तीनवेळा आमदार झाले आहेत. राष्ट्रवादी (अप) मधून त्यांच्या नावाची चर्चा जिल्ह्यात होत आहे.

जिल्ह्याचा कौल सत्तेकडेलातूरला कायम मंत्रिपदे राहिली आहेत. काँग्रेस काळात केंद्रात अनेक खात्यांचे मंत्री, राज्यात मुख्यमंत्री तसेच बहुतांश खात्यांचे कॅबिनेट मंत्रिपद लातूरकडे राहिले आहे. युती आणि महायुतीच्या काळातही राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री पदे लातूरला मिळाली आहेत. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस कौल असून, पाच आमदार निवडून आले असून, लातूरचे किमान एक - दोन मंत्री असणार, याला पुष्टी मिळत आहे. मात्र, त्याचवेळी महायुतीचे स्थिर सरकार आले असून, राज्यभरातून दावेदारांची संख्या लक्षात घेता दोन्ही पक्षांना संधी मिळणार की एकावरच समाधान मानावे लागणार, हा पेच आहेच.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकlaturलातूरlatur-rural-acलातूर ग्रामीणausa-acऔसाnilanga-acनिलंगाahmadpur-acअहमदपूरudgir-acउदगीर