जयंती अध्यक्षपदी मिलिंद महालिंगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:20 IST2021-04-08T04:20:11+5:302021-04-08T04:20:11+5:30
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक मिलींद महालिंगे यांची सर्वानुमते निवड ...

जयंती अध्यक्षपदी मिलिंद महालिंगे
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक मिलींद महालिंगे यांची सर्वानुमते निवड सोमवारी करण्यात आली आहे. चाकुरातील वैशाली बुद्ध विहारात झालेल्या बैठकीत जयंती महोत्सव समिती स्थापन करण्यात आली. बैठकीत सलग साहाव्यांदा जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी मिलिंद महालिंगे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. कार्यकारणीत उपाध्यक्ष सुर्यकांत कांबळे, सचिव पपन कांबळे, सहसचिव प्रभाकर गायकवाड, कोषाध्यक्ष बालाजी अडसूळ, विक्की महालिंगे, चेतन महालिंगे यांची निवड करण्यात आली. जयंतीनिमित्त कोरोना नियम आणि अटीचे पालन करुन विविध कार्यक्रम, उपक्रम घेतले जाणार आहे. बैठकीला प्रा. वैजनाथ सूरनर, धर्मेद्र बोडके, नागशेन महालिंगे, बाबासाहेब कांबळे, करण महालिंगे, रुपेश सरवदे, समाधान कांबळे, सूरज उडाणशिव, सिद्धार्थ गायकवाड, वैभव गायकवाड, अनिल सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते.