निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

By संदीप शिंदे | Updated: October 2, 2023 14:30 IST2023-10-02T14:30:25+5:302023-10-02T14:30:38+5:30

निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात मागील वर्षीही भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते.

Mild earthquake shock in Hasori area of Nilanga taluk | निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात सोमवारी सकाळी ६.२९ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून, औराद येथील भूकंपमापक यंत्रावर २.८ रिस्टर स्केलची नोंद झाली आहे.

निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात मागील वर्षीही भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. त्यामुळे दिल्ली येथील पथकाने या ठिकाणी पाहणी करून औराद शहजानी येथे यंत्र बसविले होते. सोमवारी सकाळी ६.२९ वाजता हासोरी परिसरात भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याचे भूकंप मापक केंद्राचे आर.ए. साळुंखे यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी म्हणाले, सोमवारी  सकाळी हासोरी परिसरातील सौम्य धक्क्याची नोंद झाली असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

Web Title: Mild earthquake shock in Hasori area of Nilanga taluk