आपल्या हिरव्या भावंडांचे चांगले रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेऊ या, शहरातील मोठ्या झाडांचे, दुर्मिळ झाडांचे आपण जतन करू या हा विचार करत ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी झाडांना राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा केला. शिवाय, या सणाच्या माध्यमातून झाडे लावा, झाडे वाचवाचा संदेश देण्यात आला. यावेळी झाडांना राखी बांधून वृक्ष रक्षणाची प्रतिज्ञाही घेण्यात आली. कार्यक्रमात मीनाक्षी बोंडगे, अशा आयाचित, पूजा पाटील, लक्ष्मीताई बटनपूरकर,सिद्धेश माने, विदुला राजमाने, कल्पना फरकांडे, डॉ.पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, पद्माकर बागल, बाळासाहेब बावणे, महेश गेलडा, विजयकुमार कटारे, मूव्हीज मिर्झा राहुल माने, सार्थक शिंदे, प्रसाद श्रीमंगले, विश्वजित भुतडा, संजना कटारे, खुशीत कठारे, मोईज मिर्झा, ख्वाजा पठाण, राहुल माने, सार्थक शिंदे, प्रसाद श्रीमंगले, विश्वजित भुतडा, संजना कठारे, खुशी कठारे, अरविंद फड, कपील काळे, शैलेश सूर्यवंशी, दयाराम सुडे, बालाजी उमरदंड, विदुला राजेमाने, श्रवण पाटील, ज्ञानोबा केंद्रे आदींनी परिश्रम घेतले.
झाडाला राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST