शिवाजी महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST2020-12-05T04:32:34+5:302020-12-05T04:32:34+5:30
यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जगताप, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. एस. धनगे, प्रा. व्ही.आर. भोसले उपस्थित ...

शिवाजी महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जगताप, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. एस. धनगे, प्रा. व्ही.आर. भोसले उपस्थित होते. यावेळी आकांक्षा कलमे, गीतांजली गायकवाड, वैशाली एकंबेकर, खान माहीम बेगम, हाश्मी रुमेशा साजिद, शेख बिलकिश मुस्तफा यांनी वैद्यकीय तर अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेत ऐश्वर्या पाटील, आशिष घोगरे, आकांक्षा कलमे यांनी यश संपादन केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. जाधव म्हणाले, सध्याचे युग स्पर्धेचे असल्याने विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम करीत चांगले गुण मिळविले पाहिजे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा देणे, अभ्यास करणे खूप कठीण झाले होते. याही काळात आपली गुणवत्ता टिकवून ठेवल्यामुळे महाविद्यालयाचे नाव झाले आहे. सूत्रसंचालन प्रा. एस. एस. धनगे यांनी केले. आभार प्रा. आनंद पाटील यांनी मानले.
***