संजीवनी महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST2021-08-14T04:24:08+5:302021-08-14T04:24:08+5:30
चापोली : येथील संजीवनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. महाविद्यालयाचा ...

संजीवनी महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
चापोली : येथील संजीवनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून, गुणवंतांचा सत्कार संस्था सचिव डॉ. नारायणराव चाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
विज्ञान शाखेतील शिवप्रसाद मठपती याने ९४.१६ टक्के, अनिकेत नागदरे याने ९३.८३ टक्के तर विवेक चाटे याने ९३ टक्के गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. वाणिज्य शाखेतील चंद्रकांत आठखिळे याने ९१ टक्के, वैशाली आटोळकर हिने ९०.८३ टक्के तर शैलेश होनराव याने ९०.६६ टक्के गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. कला शाखेत भाग्यश्री पुरी हिने ९०.५० टक्के गुणांसह प्रथम, आकाश राठोड याने ९० टक्के गुणांसह द्वितीय, रोहित वडजे याने ८९.८९ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. तसेच उर्दू शाखेतून फरहिन सुलताना अब्दुल जब्बार हिने ८९.५ टक्के, महजेबीन अब्दुल जब्बार तांबोळी हिने ८८.१६ टक्के तर मुस्कान बागवान हिने ८७.६६ टक्के गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
लक्ष्मण सूर्यवंशी, विश्वनाथ उत्तरवार, कृष्णा खेडकर, ज्ञानोबा माने, रोहित गुट्टे, नेहा सोगेवाड, साक्षी सावंत, हसनीन सय्यद, निकिता खुडे, ऋषिकेश, गौरव गुट्टे, हुसेन शेख, प्रवीण नागरगोजे, अंजली सुगावकर, संकेत मुळे, रेणुका दवणे, गायत्री गित्ते, तृप्ती अंधारे, जया आटोळकर, ताहर मोमीन, कोमल माळी, अविनाश खांडेकर, साक्षी काळे, ज्ञानेश्वरी सूर्यवंशी, अजय कांबळे, नमेजा मोनीने, सानिया मोमीन, ओमकार नरहरे, परवीन शेख या विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत यश संपादन केले आहे. गुणवंतांचा सत्कार संस्था सचिव डॉ. नारायणराव चाटे यांनी केला. गुणवंतांचे कौतुक विश्वनाथ शेटकर, डॉ. रामराव दुडिले, प्राचार्य डॉ. धनंजय चाटे, रामचंद्र तिरुके, काशिनाथ गंगापुरे, रंजनाताई कराड, मल्लिकार्जुन स्वामी, व्यंकटराव होनराव, बब्रुवान आवस्कर, भगवान सोमवंशी, उपप्राचार्य डॉ. भालचंद्र चाटे, मुख्याध्यापक गणेश पटणे, संभाजी कोले, प्रा. रमेश गुट्टे आदींनी केले आहे.