व्यापाऱ्याला जबर मारहाण, ८० हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:24 IST2021-02-25T04:24:14+5:302021-02-25T04:24:14+5:30
पाेलिसांनी सांगितले, गौस चौधरी (रा. वडवळ नागनाथ) यांना आत्तार इब्राहीम चौधरी यांनी शिवीगाळ करून दुकान बंद करण्याची धमकी ...

व्यापाऱ्याला जबर मारहाण, ८० हजारांचा ऐवज लंपास
पाेलिसांनी सांगितले, गौस चौधरी (रा. वडवळ नागनाथ) यांना आत्तार इब्राहीम चौधरी यांनी शिवीगाळ करून दुकान बंद करण्याची धमकी दिली. त्यावेळी गौस चौधरी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे निघाले असता, दाऊद ऊर्फ मेहबूब चौधरी, अथर चौधरी यांच्यासह अन्य दोघांनी लोखंडी पाइप आणि खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली. गौस चौधरी यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट आणि खिशात असलेले ३० हजार रुपये काढून घेतले. गौस यांनी आरडाओरड केली तेव्हा गौस यांचा भाऊ असीफ व पत्नी रुक्साना तेथे दाखल झाले. त्यावेळी त्यांनाही या चौघांनी मारहाण केली, असे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी करीत आहेत.