खारूताईच्या आईला मोटारसायकलीनं चिरडलं, मेहबूब चाचांनी पिल्लांना जगवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 07:53 PM2019-02-12T19:53:30+5:302019-02-12T21:02:24+5:30

लातूरमधील मेहबूब चाचांनी खारूताईच्या पिलांना दिले जीवनदान

mehboob chacha saved two sequral life | खारूताईच्या आईला मोटारसायकलीनं चिरडलं, मेहबूब चाचांनी पिल्लांना जगवलं

खारूताईच्या आईला मोटारसायकलीनं चिरडलं, मेहबूब चाचांनी पिल्लांना जगवलं

Next

लातूर : मोटारसायकलीने चिरडल्याने ठार झालेल्या खारुताईच्या शेजारी तिची दोन पिले रस्त्याच्या मधोमध बराचवेळ बसून होती. मातृत्वाला पोरकी झालेली खारुताईची दोन पिले रस्त्यावरून ये- जा करणा-यांचे लक्ष वेधत होती. त्याचवेळी असंख्य पशुपक्ष्यांना जीवदान देणारे लातूरमधील मेहबूब चाचा यांची नजर पिलांवर गेली. त्यांनी लागलीच या दोन्ही पिलांच्या घरी आणले.

मेहबूब चाचा गेल्या दीड महिन्यांपासून खारुताईची पिल्ले सांभाळत आहेत. कापसाच्या बोळ्याने त्यांना दूध पाजले आणि पिल्ले तंदुरुस्त झाल्यानंतर त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडले. 

अपघातात तडफडणाऱ्या श्वानालाही जीवदान

जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या निवास स्थानासमोर अज्ञात वाहनाच्या अपघातात एक श्वान गंभीर जखमी झाला. त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. ही बाब जिल्हाधिका-यांनी सुरक्षा रक्षक माणिक चव्हाण यांना सांगितली, अन् त्यावर उपचार करण्याच्या सूचना दिल्या. चव्हाण यांनी मेहबूब चाचांशी संपर्क केला. त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात श्वानावर उपचार करून दोन महिने स्वत:च्या घरी सांभाळ केला. तो श्वानही आता ठणठणीत बरा झाला आहे. 

पाहा व्हिडीओ - 

https://www.facebook.com/lokmat/videos/264782077775995/?__xts__[0]=68.ARDgU2rWTMQLlb9-xZFArT6C-VG7LGjUO9WImdYfPA3buBCtkSv_5mBJ2WOUbIx9zh6a7bSkycwrN8GzJ_Oo4Gxf_WCD7wd-3_bb2ZziCP6ZdmIUffFgg2eSESl-YQA5Vz7X2DjjN8NbMfb7a_oIYqxc4ZxxGVPchz84PxIOuL7U3B2DZBdRDTKBQbOOtqQkr5gs8PRmcSTmjBcfxwAlSHG6ej3GToFmFRn6gS-SeVLOX2KEyE9F3CZPZvE1WI7-AAI6wEXVCv3bWDCDsRzxJHyNjtmCIIDJBl59xAx6ao-tBb-uvxEEPzo_4-xwGS2292VHUSqjTSCsYEevVD-tS2L-Sh6amhPU6zo&__tn__=-R

Web Title: mehboob chacha saved two sequral life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.