राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST2021-08-26T04:22:44+5:302021-08-26T04:22:44+5:30

या बैठकीत पक्ष कुठे कमी पडत आहे आणि पक्षवाढीसाठी काय करता येईल, यावरही चर्चा झाली. बुथ संघटन मजबूत करण्यावर ...

Meeting of District Executive of NCP | राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक

या बैठकीत पक्ष कुठे कमी पडत आहे आणि पक्षवाढीसाठी काय करता येईल, यावरही चर्चा झाली. बुथ संघटन मजबूत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे. तसेच ‘एक बुथ दहा युथ’ ही मोहीम प्रभावीपणे राबवा अशा सूचना करण्यात आल्या,तसेच आपसातले मतभेद विसरून एकजुटीने आपल्याला काम करायचं आहे. येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्याला अधिक जागा जिंकायच्या आहेत. हा संकल्प घेऊन सर्वांनी कामाला लागा, असा संकल्प बैठकीत केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबासाहेब पाटील, शहर-जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे, प्रदेश सचिव संजय शेटे, प्रदेश संघटक सचिव मुफ्ती फैय्याज अली, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष अफसर शेख, लातूर शहर-जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, माजी जि. प. अध्यक्ष पंडितराव धुमाळ, माजी महापौर जमील अख्तर मिस्त्री, नगरसेवक राजा मणियार, रशीद शेख, रेखाताई कदम, विशाल विहिरे, गजानन खमितकर, समीर शेख, पूजा गोरे, मनीषा कोकणे, स्नेहा मोटे, साक्षी कांबळे, जितेंद्र गायकवाड, राहुल कांबळे, टिल्लू शेख, नामदेव जाधव, किरण बडे, राजेश खटके, फारुख तांबोळी, बरकत शेख, अनिल गायकवाड, बाळासाहेब जाधव, अलीम काजी, रामभाऊ रायेवार, शेखर हविले, इब्राहिम सय्यद, सोहम गायकवाड, स्वप्नील दीक्षित, प्रदीप पाटील, ताज शेख, सद्दाम पटेल, मुन्ना खान, एहरार हक्कानी, प्रवीण थोरात, परवेझ सय्यद, जहांगीर शेख, नवनाथ आल्टे यांच्यासह सर्व सेल पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Meeting of District Executive of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.