भेटा गावच्या सरपंचपदी शाम शेळके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:18 IST2021-02-14T04:18:39+5:302021-02-14T04:18:39+5:30
लातूर : औसा तालुक्यातील भेटा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शाम शेळके तर उपसरपंचपदी दगडू ढोले यांची शुक्रवारी निवड करण्यात आली़ भेटा ...

भेटा गावच्या सरपंचपदी शाम शेळके
लातूर : औसा तालुक्यातील भेटा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शाम शेळके तर उपसरपंचपदी दगडू ढोले यांची शुक्रवारी निवड करण्यात आली़
भेटा ग्रामपंचायत ही ११ सदस्यांची आहे़ निवडणुकीत बालाजी हजारे यांच्या पॅनलचे पाच, शाम शेळके यांचे तीन व दगडू ढोले यांच्या पॅनलचे तीन सदस्य निवडून आले़ परिणामी, राजकीय परिस्थिती त्रिशंकू होती़ गावात सरपंच आणि उपसरपंच काेण हाेणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले होते़ शुक्रवारी सरपंच व उपसरपंच या पदाची निवड अध्यासी अधिकारी बी़ पी़ तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीत सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती़ यावेळी सरपंचपदासाठी शाम दत्तात्रय शेळके आणि सोमनाथ माने यांनी आपले अर्ज दाखल केले हाेते. यावेळी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये शेळके यांना ६ तर माने यांना ५ मते पडली. त्यानंतर शेळके यांना सरंपच म्हणून जाहीर करण्यात आले.
तर उपसरपंचपदासाठी दगडू नरहारी ढोले आणि सावित्री बालाजी हजारे यांनी आपले अर्ज दाखल केले हाेते. दरम्यान, यासाठी मतदान प्रक्रिया झाली. यामध्ये ढोले यांना ६ आणि हजारे यांना ५ मते मिळाली़ यानंतर अध्यासी अधिकारी तेलंग यांनी उपसरपंचपदी दगडू ढोले यांची निवड जाहीर केली. यावेळी नूतन सदस्य सुलतान जावळकर, सुमन माने, संध्या जाधव, रमाकांत कांबळे, सोमनाथ माने, गोदावरी तरकसे, शोभा कांबळे, सावित्री हजारे, अनुराधा ढोले, ग्रामसेविका जी़ एस़ कट्टेमनी, तलाठी सुजाता राठोड यांच्यासह भारत लोकरे, सागर भोकरे, बालाजी लोंढे, दगडू मुळे, दिनकर जाधव, लखन दळवे, आत्माराम माने, उत्तम शेळके, देविदास जाधव, श्रीकृष्ण माने, मुबारक व्होगाडे, दिलदार व्होगाडे, हाबीब मणियार यांच्यासह नागरिक उपस्थित होते़ यावेळी नूतन सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला़