नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST2021-09-16T04:26:02+5:302021-09-16T04:26:02+5:30

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय? तामिळनाडू सरकारने तेथील बोर्डाच्या गुणांवर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याचे विधेयक संमत केले आहे. ...

Medical admission without proper payment; Expert, what do students think? | नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?

तामिळनाडू सरकारने तेथील बोर्डाच्या गुणांवर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याचे विधेयक संमत केले आहे. सरकारी व खासगी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेतील गुणांच्या आधारे तेथे प्रवेश मिळू शकेल.

धक्कादायक निर्णय

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीट ही केंद्रीय परीक्षा योग्य आहे. तिच्या स्वरूपाबद्दल चर्चा होऊ शकते. ती वगळून बोर्डाच्या गुणांवर प्रवेश देणे गुणवंतांवर अन्यायकारक ठरेल. ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असल्याने तिच्यावर कोणाचाही प्रभाव राहत नाही. - प्रा. डी. के. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ

नीट परीक्षेसाठी सीबीसीचा अभ्यासक्रम आहे. बोर्डाचा अभ्यासक्रम वेगळा आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यावर हे दुहेरी ओझे आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकारने नीटला विरोध दर्शविला असेल. - प्रा. दासराव सूर्यवंशी, शिक्षणतज्ज्ञ

विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

स्टेट बोर्डाचा आणि नीटच्या अभ्यासक्रमाचा सिलॅबस सारखा असायला पाहिजे. बोर्डाची आणि नीटला सीबीसी बोर्डाचा अभ्यासक्रम. त्यावेळी सारखा अभ्यासक्रम करून एकच परीक्षा असली तरी काही हरकत नाही. मग राज्यासाठी सीईटी कशाला, असा प्रश्न विद्यार्थी करीत आहेत.

सीईटी, नीट अशा वेगवेगळ्या परीक्षा प्रवेशासाठी घेतल्या जातात. त्याऐवजी केंद्रीय अथवा राज्यपातळीवर काही ठरावीक कोटा ठरवून एकच प्रवेश परीक्षा व्हायला पाहिजे. वेगवेगळ्या परीक्षा होत असल्याने आमच्यासारखे विद्यार्थी संभ्रमात राहतात. हा संभ्रम दूर करण्याची गरज आहे.

Web Title: Medical admission without proper payment; Expert, what do students think?