मायबाेली मराठी भाषेला राजाश्रयाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:36 IST2021-03-04T04:36:00+5:302021-03-04T04:36:00+5:30
चाकूर तालुक्यातील चापाेली येथील संजीवनी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ...

मायबाेली मराठी भाषेला राजाश्रयाची गरज
चाकूर तालुक्यातील चापाेली येथील संजीवनी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. धनंजय चाटे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. भालचंद्र चाटे, प्रा. बी.बी. केंद्रे, प्रा. गौतम बनसोडे, प्रा. निवृत्ती गोडभरले यांची उपस्थिती हाेती. प्रारंभी, वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. यामध्ये चंद्रकांत अटखिळे, आदित्य माकणीकर, सुप्रिया सोमवंशी या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. धीरज व्हत्ते, डॉ. सचिन चोले, डॉ. मुस्तफा शेख यांनी केले. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार ढोले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप मुंढे यांनी केले, तर आभार डॉ. नामदेव सोडगीर यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित हाेते.