‘मातृभूमी’ने ११०० लातूरकरांना सव्वा काेटीला गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:14 IST2021-07-01T04:14:54+5:302021-07-01T04:14:54+5:30
पाेलिसांनी सांगितले, पाच वर्ष दरमहा ५०० रुपये भरल्यानंतर ३० हजार रुपये जमा हाेतात. ही कंपनी ३० हजार रुपयांपेक्षा ४४ ...

‘मातृभूमी’ने ११०० लातूरकरांना सव्वा काेटीला गंडविले
पाेलिसांनी सांगितले, पाच वर्ष दरमहा ५०० रुपये भरल्यानंतर ३० हजार रुपये जमा हाेतात. ही कंपनी ३० हजार रुपयांपेक्षा ४४ हजार रुपये देणार असल्याने सामान्य नागरिक याला बळी पडले. त्यातूनच लातूरच्या नागरिकांनी सदर कंपनीच्या याेजनेला प्रतिसाद दिला. २०१३ मध्ये कंपनीने काही नागरिकांना याेजनेचा लाभ देण्यासही सुरुवात केली. कंपनीने काही लाेकांना एजंट म्हणून नियुक्त केले. त्यानंतर चांगले कमिनशनही दिले. त्यातून जास्तीत-जास्त ग्राहक कसे मिळतील, याचा प्रयत्न करण्यात आला़ लाभ मिळत असल्याने नागरिकांचा प्रारंभी विश्वास बसला. त्यानंतर जवळपास १ हजार १०० नागरिकांनी पैसे भरले. २०१८ मध्ये मात्र कंपनीने नागरिकांना पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. पैसे देण्याबाबत चालढकलपणा केला. त्यात २०१८ मध्ये कंपनीने आपले कार्यालयही बंद केले. दरम्यान, कंपनीचे एजंट म्हणून कार्यरत असणारे उद्धव लक्ष्मण शिंदे (रा. आनंदवाडी ता. निलंगा) यांना कंपनीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात कंपनीच्या चार संचालकांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला.
रत्नागिरी, उस्मानाबाद, हिंगाेलीतही गुन्हा...
मातृभूमीने आपला कारभार महाराष्ट्रासह इतर राज्यांत सुरू केला हाेता, हे आता समाेर आले आहे. नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी, उस्मानाबाद, हिंगाेली आणि आता लातूर जिल्ह्यात कंपनीच्या संचालकांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिणामी, फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्या-त्या जिल्ह्यांतील नागरिकांना काेट्यवधींना गंडविल्याचे समाेर आले आहे.
इतर जिल्ह्यांत तिघांना अटक...
राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात काेट्यवधींना गंडा घालणाऱ्या मातृभूमीच्या तिघा संचालकांना रत्नागिरी आणि गुजरात पाेलिसांनी अटक केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आता लातूर येथील फसणवूक प्रकरणात या तिघांना चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. असे जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले.