सोशल मीडियावरुन जुळले प्रेम, प्रेमीयुगुलास पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:19 IST2021-03-26T04:19:58+5:302021-03-26T04:19:58+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात १२ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची उत्तर प्रदेशातील एका मुलाबरोबर इन्स्टाग्रामवरून ...

सोशल मीडियावरुन जुळले प्रेम, प्रेमीयुगुलास पोलिसांनी घेतले ताब्यात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात १२ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची उत्तर प्रदेशातील एका मुलाबरोबर इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. सतत एकमेकांनी वर्षभरापासून चॅटिंग सुरू केली. दरम्यान, सदरील मुलगा नाशिक येथे एका कारखान्यात काम असल्याचे सांगून सदरील मुलीस नाशिक येथे बोलावले. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये जाण्याची योजना आखली.
दरम्यान, अल्पवयीन मुलगी एक दिवस घरी आली नसल्याचे पाहून तिच्या मामाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तत्परतेने पूर्ण तपास सुरू केला असता तिच्या वहीत पुणे मार्गे नाशिक, सिन्नर मार्ग दाखविल्याचे सापडले. त्यावरून धागेदोरे शोधत आणि सिन्नर पोलिसांची मदत घेत सदरील प्रेमीयुगुलास ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर प्रेमीयुगुलास गुरुवारी अहमदपूर येथे आणण्यात आले. सदरील अल्पवयीन मुलीस फूस लावल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डंख, पोकॉ संतोष गेडाम, पोकाॅ प्रियंका त्रिभुवन करीत आहेत.