लातुरच्या पासपोर्ट कार्यालयाला मिळतोय भरघोस प्रतिसाद;नागरिकांची वेळ आणि पैशांची होतेय बचत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 06:30 PM2018-11-29T18:30:02+5:302018-11-29T18:32:52+5:30

यामुळे लातूरकरांना दिलासा मिळाला असून पासपोर्टसाठी सोलापूर, नागपूरचे खेटे बंद होऊन वेळ आणि पैस्यांची बचत होत आहे. 

Massive response to Latur's passport office; Savings by time of citizens and money | लातुरच्या पासपोर्ट कार्यालयाला मिळतोय भरघोस प्रतिसाद;नागरिकांची वेळ आणि पैशांची होतेय बचत 

लातुरच्या पासपोर्ट कार्यालयाला मिळतोय भरघोस प्रतिसाद;नागरिकांची वेळ आणि पैशांची होतेय बचत 

googlenewsNext
ठळक मुद्देपासपोर्ट कार्यालयात महिनाभराची वेटिंगदररोज २० ते २५ जणांच्या कागदपत्रांची होतेय छाननी

लातूर : दीड महिन्यापूर्वी सुरू झालेल्या लातूर येथील पासपोर्ट कार्यालयाला भरघोस प्रतिसाद मिळत ंअसून, दिवसभरात जवळपास २० ते २२ जणांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. यामुळे लातूरकरांना दिलासा मिळाला असून पासपोर्टसाठी सोलापूर, नागपूरचे खेटे बंद होऊन वेळ आणि पैस्यांची बचत होत आहे. 

परराष्ट्र मंत्रालय व डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ११ आॅक्टोबरपासून लातूर येथे पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज सुरू झाले आहे. प्रारंभीपासूनच अर्जदारांची संख्या वाढली आहे. लातूर कार्यालयात पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना जवळपास एक ते दीड महिना वेटिंगवर राहावे  लागत आहे.  केवळ तीन कर्मचाऱ्यांवर सुरू असलेल्या या कार्यालयात दररोज २० ते २५ जणांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे. दीड महिन्यात जवळपास एक हजार अर्ज आले असून, बहुतांश अर्जांची पडताळणी झाली आहे. 

लातूर येथे कार्यालय सुरू व्हावे, यासाठी मागील दहा वर्षांपासून मागणी होती. ११ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या कार्यालयात तातडीने सुविधा मिळत असल्याने अर्जदारांचीही सोय झाली आहे. यापूर्वी लातूरच्या नागरिकांना नागपूर, पुणे किंवा सोलापूरला जावे लागत होते. सध्या हज यात्रा व उमराहसाठी जाणाऱ्या भाविकांचे अर्ज अधिक आहेत. याशिवाय, लातुरात कार्यालय झाल्यामुळे अनेकजण पासपोर्ट काढून घेत आहेत.

नवीन असलेल्या कार्यालयात शाखा प्रमुख म्हणून प्रफुल्ल सिंग तसेच सहायक म्हणून मदन पुंड व प्रदीप जगताप काम पाहत आहेत. यात प्रफुल्ल सिंग हे परराष्ट्र मंत्रालयाकडून लातूर कार्यालयात प्रमुख आहेत. तर स्थानिक पोस्ट कार्यालयातून दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दररोज किमान २५ जणांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आमंत्रित केले जाते. त्यामुळे दिलेल्या वेळेत काम होत असल्याने अर्जदारही समाधान व्यक्त करीत आहेत.

परदेशात नोकरी, व्यवसाय किंवा पर्यटनसाठी जाणाऱ्या नागरिकांना पासपोर्ट काढायला  पूर्वी बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागत असल्याने वेळ आणि पैसा अधिक खर्च करावा लागत होता. आता लातूरला कार्यालय झाल्याने चांगली सोय झाली आहे. दरम्यान, लातूर येथील  पासपोर्ट कार्यालयाचे व्यवस्थापक प्रफुल्ल सिंग म्हणाले, ११ आॅक्टोबरपासून कामकाज सुरू झाले आहे. दररोज किमान २० ते २२ जण पडताळणीसाठी येत आहेत. सध्या किमान महिनाभराची अर्जदारांना वेटिंग आहे.

Web Title: Massive response to Latur's passport office; Savings by time of citizens and money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.