शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Latur: रुग्णाला नेण्याचा कॉल आला, चालकाने चावी फिरवताच १०८ रुग्णवाहिकेला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:31 IST

इंजिनमध्ये बिघाड, ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटासारख्या आवाजात जळाली संपूर्ण रुग्णवाहिका

औसा (जि. लातूर) : ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात उभी केलेली १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका आज दुपारी आगीत भस्मसात झाली. आग एवढी भीषण होती की, संपूर्ण गाडी काही मिनिटांत जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

रुग्णालयात दाखल झालेल्या एका गंभीर पाय दुखापतग्रस्त रुग्णाला लातूरला हलवण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले होते. चालक युवराज कांबळे यांनी एम.एच.१४ सी.एल.०८५८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू करताच इंजिनमधून कट-कट आवाज येऊ लागले. दोन प्रयत्नांनंतर गाडीच्या समोरील भागातून अचानक आग लागली. चालकाने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने काही क्षणांतच उग्ररूप धारण केले.

गंभीर बाब म्हणजे, रुग्णवाहिकेत दोन ऑक्सिजन सिलिंडर होते. आगीदरम्यान सिलिंडरमधून स्फोटासारखे आवाज येत होते, ज्यामुळे आजूबाजूचे कर्मचारी आणि रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.बी. थडकर आणि त्यांच्या टीमने प्रसंगावधान राखत रुग्णांना वेळीच बाहेर काढले.

अग्निशमन दलाचा उशीरघटनेनंतर स्थानिक नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. मात्र बंब तब्बल ५० मिनिटे उशीरा घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत संपूर्ण रुग्णवाहिका कोळशात रूपांतरित झाली होती. यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

१०८ साठी जागेचा प्रश्न कायमरुग्णालयात खाजगी रुग्णवाहिकांना प्रवेश व पार्किंग सुविधा दिली जात असली तरी १०८ रुग्णवाहिका मात्र मागच्या रस्त्यावर उभी केली जाते, ही वस्तुस्थिती उघड झाली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता पाटील यांनी यासंदर्भात नगरपरिषद व पोलिसांकडे पत्रव्यवहार केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

१२ वर्ष जुनी गाडी; नुकतीच देखभाल झाली होतीसदर १०८ रुग्णवाहिका मागील १२ वर्षांपासून सेवेत असून काही महिन्यांपूर्वीच तिची देखभाल-दुरुस्ती करण्यात आली होती. तरीही इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला आणि आग लागली. नेमकी आग कशामुळे लागली हे अधिकृत तपासणीनंतर स्पष्ट होईल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरfireआग