भक्तीस्थळावर सामुहिक लिंग पूजन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST2021-03-13T04:35:39+5:302021-03-13T04:35:39+5:30
यावेळी आचार्य गुरुराज स्वामी, राजशेखर शिवलिंग शिवाचार्य, शिलाबाई शेटकर, पद्मिनी खराडे, विजया स्वामी आदींनी गुरुवर्यांच्या समाधीसमोर सामूहिक इष्टलिंग पूजा ...

भक्तीस्थळावर सामुहिक लिंग पूजन कार्यक्रम
यावेळी आचार्य गुरुराज स्वामी, राजशेखर शिवलिंग शिवाचार्य, शिलाबाई शेटकर, पद्मिनी खराडे, विजया स्वामी आदींनी गुरुवर्यांच्या समाधीसमोर सामूहिक इष्टलिंग पूजा करून आरती केली. ग्रामदैवत महादेव मंदिरात रुद्र महिला मंडळाच्या वतीने सामूहिक रुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी विजयाताई चवंडा, कस्तुर कल्याणे, शांताबाई गिराम यांच्यासह महिला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या. चिलखा येथील मंदिर सकाळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून आरती करण्यात आली. यावेळी बाळासाहेब होळकर यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते. दरम्यान, मंदिरांना महसूल प्रशासनाच्या वतीने भेटी देऊन मास्कचा वापर करावा. भक्तांना फिजिकल डिस्टन्स राखण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.