औसा बाजार समितीतर्फे मास्क, सॅनिटायझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST2021-05-05T04:32:39+5:302021-05-05T04:32:39+5:30
.... खरीप हंगामपूर्व शेतीकामे जोरात सुरू रेणापूर : खरीप हंगाम महिनाभरावर आला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामपूर्व कामे ...

औसा बाजार समितीतर्फे मास्क, सॅनिटायझर
....
खरीप हंगामपूर्व शेतीकामे जोरात सुरू
रेणापूर : खरीप हंगाम महिनाभरावर आला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामपूर्व कामे करण्यात व्यस्त आहेत. सध्या शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती मशागत करणे, दसकट वेचणे, बांध दुरुस्त करून घेणे, ओढे काढून घेणे अशी कामे करण्यात व्यस्त आहेत. यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त हाेत आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचा शेतीकडे जाण्यावर अधिक भर असल्याचे दिसून येत आहे.
...
कोविड हॉस्पिटलमधील सेवा-सुविधांची पाहणी
निलंगा : शहरातील कोविड डेडिकेटेड हॉस्पिटलला शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश रेशमे यांनी भेट देऊन तेथील सोयी-सुविधांची पाहणी केली. तसेच रुग्णांशी संवाद साधला. या वेळी तहसीलदार गणेश जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सौंदळे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, सुनील नाईकवाडे, श्रीनिवास भोसले आदी उपस्थित होते.