सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST2021-07-26T04:19:54+5:302021-07-26T04:19:54+5:30
भाग्यश्री नारायण पवार (३०, रा. खुंटेगाव, ता. औसा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. औसा पोलिसांनी सांगितले, फिर्यादी शिवाजी मारुती ...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
भाग्यश्री नारायण पवार (३०, रा. खुंटेगाव, ता. औसा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. औसा पोलिसांनी सांगितले, फिर्यादी शिवाजी मारुती गाडे (रा. रेणापूर) यांनी पोलिसांत तक्रार दिली असून आपल्या मुलीचा सासरकडील मंडळींनी पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ केला. त्यामुळे तिने विषारी द्रव घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूस सासरची मंडळी कारणीभूत आहेत. या फिर्यादीवरून आरोपी नारायण केशव पवार, लक्ष्मी अरविंद पवार, अरविंद रतन पवार (सर्वजण रा. खुंटेगाव) व सुवर्णा माधव शिंदे (रा. फत्तेपूर) यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपींना रविवारी पोलिसांनी अटक केली आहे. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. डी. बहुरे हे करीत आहेत.