पाेलिसांनी सांगितले, विवाहिता मनिषाचा विवाह औसा तालुक्यातील लामजना येथील दत्तू चाैगुले यांच्याशी गतवर्षीच रितीरिवाजाप्रमाणे झाला. लग्नानंतर मनिषाला पतीसह सासरच्या मंडळींनी सहा महिने चांगले नांदविले. दरम्यान, विवाहिता मनिषाचा छळ सुुरू झाला. आम्हाला प्लाॅट घ्यायचा आहे, माहेरहून चार लाख रुपये घेऊन ये, म्हणून पतीसह सासू आणि दाेन नणंदा यांनी मानसिक, शाररीक छळ सुरु केला. टप्प्या-टप्प्याने हा जाच टाेकाला गेला. त्यातूनच सतत उपाशी ठेवणे, वेळप्रसंगी शिवीगाळ करत मारहाण करणे, माहेरहून पैसे नाही आणले तर दुसरे लग्न करून तुला जीवे मारू, असे म्हणत धमकी दिली. अखेर सासरच्या छळाला कंटाळलेल्या मनिषाने किल्लारी पाेलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पती दत्तू चाैगुले याच्यासह सासू आणि दाेघी नणंद यांच्याविराेधात कलम ४९८, ३२३, ५०४, ५०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधित तपास बीटजमादार सचिन उस्तुरगे करत आहेत.