जिल्ह्याभरात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST2021-09-18T04:21:22+5:302021-09-18T04:21:22+5:30
लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संचालक रविशंकर मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात ...

जिल्ह्याभरात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा
लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संचालक रविशंकर मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन योगाचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमास प्राचार्या दुर्गा भताने, समन्वयक रौफ शेख, शाहूराज कचरे, रुपाली कोकाटे, मकरंद सबनीस, नम्रता झांबरे, प्रशांत जाधव, वर्षा लिंबूटे, गणेश इरकर, कमल मुंडे उपस्थित होते.
गोविंदलाल कन्हैयालाल जोशी वाणिज्य महाविद्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी हरीहर प्रतिष्ठानचे सचिव धनराज जोशी, कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत जोशी, रमेश बोरा, प्र. प्राचार्य डॉ. सुजाता चव्हाण, डॉ. सचिन प्रयाग,डॉ. ममता पारीख, प्रा. कुसुम अग्रवाल आदींसह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
स्वामी दयानंद विद्यालय कव्हा येथे मुख्याध्यापिका अरुणा कांदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सुरेश बोयने, उपमुख्याध्यापक देशमुख, अक्कलदिवे, मोकाशे, थंबा, धामणगावे, मानकरी, मस्के आदींची उपस्थिती होती.
दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ बाभळगाव यांच्या वतीने सर्व विद्याशाखांचे एकत्र ध्वजारोहण झाले. या वेळी दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ सचिव शाम देशमुख, कोषाध्यक्ष नरसिंह देशमुख, संचालक सुवर्णाताई मुळे, भीमराव शिंदे, सुर्यकांत देशमुख, मारुती मस्के, तसेच शिक्षण विस्तारअधिकारी एन.एम.जाधव, शिवराज देशमुख, मुख्याध्यापक काकडे, मुख्याध्यापक रत्नदीप गायकवाड, चाकुंडे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार डॉ. जयदेवी पवार यांनी मानले. यशस्वितेसाठी क्रीडा विभागप्रमुख डॉ. वैशाली माढेकर, अंकुश थडकर, दत्ता फुलगामे, बालाजी देशमुख, नितीन पाटील यांनी परिश्रम घेतले.