शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: पालकमंत्र्यांच्या घरासमोर मराठा क्रांतीचे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 19:35 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या लातूर येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

लातूर : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या लातूर येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान निलंगा तालुक्यातील हरी जवळगा येथे मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या एलआयसी कॉलनीतील निवासस्थानाकडे सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलनाला जात असताना आंदोलकांना पोलिसांनी अडविले. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी बॅरिकेटस् काढून पालकमंत्र्यांचे निवासस्थान गाठले. तेथे पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांच्या नावाने बोंबही ठोकली. पालकमंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर पोलिसांनी बॅरिकेटस् लावले होते. त्यावर आंदोलकांनी हरकत घेऊन बॅरिकेटस् हटविण्याची मागणी केली. पोलिसांनी प्रतिसाद न दिल्याने आंदोलक चिडले व त्यांनी बॅरिकेटस् काढून पालकमंत्र्यांचे निवासस्थान गाठले. तेथे त्यांनी घंटानाद केला. एक मराठा - लाख मराठा अशा घोषणा दिल्या.पालकमंत्री कोठे आहेत, त्यांना मराठा समाजाच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. मराठा तरुण मरत आहेत, ते मात्र फिरत आहेत, असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. पालकमंत्री पाटील मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य असून, त्यांनी कधी आरक्षणावर गंभीर चर्चा केली नाही, हा विषय मार्गी लागावा म्हणून खंबीर भूमिका घेतली नाही. राजकारण्यांनी समाजाचे वाटोळे केले आहे. समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण हाच पर्याय असून, ते मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे आंदोलक यावेळी म्हणाले. पालकमंत्र्यांना मराठा समाजाच्या दैन्याची जाणीव असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.पालकमंत्र्यांचा निषेध...पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर बुधवारी लातूर दौऱ्यावर होते. त्यामुळे ते आंदोलकांची भेट घेतील. त्यांच्या भावना जाणून घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र आंदोलनस्थळी ते किंवा त्यांचा प्रतिनिधी न फिरकल्याने कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला.हरी जवळगा येथे आंदोलन...निलंगा तालुक्यातील हरी जवळगा येथील निलंगा-कासारशिरसी रस्त्यावर मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. एक तास रस्त्यावर कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. आंदोलनात परमेश्वर बिराजदार, बालाजी हाडोळे, खंडू कोळनुरे, गजानन पाटील, बालाजी कोळनुरे, पिंटू ढगे, लखन पाटील, शंकर हाडोळे आदींचा सहभाग होता. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणlaturलातूर