शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांतीने काढली लोकप्रतिनिधींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, श्रध्दांजली अर्पण करून पत्रकांना दिला अग्नी

By आशपाक पठाण | Updated: September 9, 2023 18:51 IST

लातूर मराठा क्रांतीच्या वतीने शनिवारी शैक्षणिक बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. याबबत मोठी जनजागृतीही करण्यात आली होती तथापि या संभाव्य अंत्ययात्रेबाबत मोर्चाने कमालीची गुप्तता पाळली होती.

लातूर : निष्क्रिय असल्याचा आरोप करीत लातूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आमदार - खासदारांची शनिवारी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत तिरडी ताब्यात घेतली व संतप्त आंदोलकांनी मराठा लोकप्रतिनिधींच्या नावे काढलेली श्रध्दांजली पत्रके एकत्र करुन त्यालाच अग्नी देत आपल्या भावनांना वाट करुन दिली.

लातूर मराठा क्रांतीच्या वतीने शनिवारी शैक्षणिक बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. याबबत मोठी जनजागृतीही करण्यात आली होती तथापि या संभाव्य अंत्ययात्रेबाबत मोर्चाने कमालीची गुप्तता पाळली होती. शनिवारी सकाळी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. प्रारंभी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन पुतळ्यासमोर बैठक दिली. त्यावेळी हलगी पथक तेथे आले त्यामुळे पोलिस काहींसे बुचकळ्यात पडले. त्यानंतर वाजत गाजत आंदोलकांनी पुतळ्यास चार- पाच प्रदक्षिणा घातल्या व ते थेट बार्शी रोडवर आले व तेथे ठेवलेली मराठा समाजाच्या आमदार- खासदारांची प्रतिकात्मक तिरडी उचलून त्यांच्या विरोधात प्रंचड घोषणाबाजी करीत अंत्यविधीसाठी खाडगाव स्मशानभूमीकडे मार्गस्थ झाले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत तिरडी ताब्यात घेतल्याने आंदोलक व पोलिसांत काहींसा तणाव निर्माण झाला. त्यानंतर रस्त्यावरच आंदोलकांनी बैठक मारुन मराठा लोकप्रतिनिधींच्या नावाने जोरदार बोंब ठोकली.

मराठा लोकप्रतिनिधींवर निष्क्रीयतेचा आरोप... -मराठा आरक्षणाप्रती मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी करीत असलेली संदिग्ध विधाने व चालढकल याचा तीव्र शब्दांत आंदोलकांनी यावेळी निषेध केला. शेवटी मराठा लोकप्रतिनीधीच्या श्रध्दांजलीची हाती असलेली पोस्टर्स एकत्र करुन त्यालाच आंदोलकांनी प्रेत समजत अग्नी दिला. एकदंरीत या लक्षवेधी आंदोलनाने मराठा समाजात मराठा लोकप्रतिनिधींविषयी असलेला असंतोष पुन्हा उफाळून आला. या आंदोलनादरम्यान बार्शी रोडवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आल्याने छावणीचे रुप आले होते.

पथनाट्यातून खदखद...मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत आपले सर्व अंग रंगवलेला व तोंड काळे केलेला एक युवक सर्वांचे लक्ष वेधत होता. त्याने सादर केलेल्या पथनाट्याद्वारे मराठा समाजातील युवकांच्या मनात मराठा लोकप्रतिनिधीविषयी असलेली खंत बोलकी झाली होती. 

टॅग्स :laturलातूरMaratha Reservationमराठा आरक्षणreservationआरक्षणagitationआंदोलन