शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे धनगर उपोषणकर्त्यांच्या भेटीला, खालावलेली प्रकृती पाहून पालकमंत्र्यांवर बरसले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 16:06 IST

राजकारणी हे जाती जातीत तेढ निर्माण करत असतात. आपण काही राजकारणी नाहीत.

लातूर: मनोज जरांगे मराठवाड्यातील शांतता रॅलीच्या निमित्ताने लातूरात आले आहेत. दरम्यान, मागील १२ दिवसापासून अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात उपोषणाला बसलेले धनगर समाजाच्या दोन तरुण चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर यांची प्रकृती खालावली आहे. याबाबत माहिती मिळताच त्यांची विचारपूस करण्यासाठी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज उपोषणस्थळ गाठले. उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेत जरांगे यांनी सर्व मराठा समाज तुमच्या मागे असल्याची ग्वाही दिली.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, जो मार्ग सत्य असेल त्यात आम्ही आपल्या सोबत आहोत. समाजाच्या न्याय, हक्काच्या मागण्यासाठी पुढे आलेच पाहिजे. राजकारणी हे जाती जातीत तेढ निर्माण करत असतात. आपण काही राजकारणी नाहीत. आपण आपल्या समाजासाठी, लेकरा बाळाच्या भविष्यासाठी काम करत असतो. धनगर समाजाच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करायलाच पाहिजे. ते कायदा सोडून काही मागत नाहीत, त्यांच्या हक्काचे मागत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात ही माझी प्रामाणिक मागणी आहे, असेही जरांगे म्हणाले. तसेच सत्तेत येण्यापूर्वी सत्ता आल्याबरोबर धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्याची पूर्तता मागील दहा वर्षापासून झाली नाही. आमरण उपोषण करण हा डेंजर प्रकार आहे. सरकारनं या लेकरांची काळजी घेतली पाहिजे, असे मत जरांगे यांनी व्यक्त केली आहे.

पालकमंत्र्यांनी तत्काळ दखल घ्यावीधनगर तरुणांचे उपोषण बारा दिवसापासून सुरू आहे तरीही अद्याप पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याची दखल घेतली नाही. त्यांच्यापर्यंत विषय गेला होता, तरी ते इथे आले नाहीत. अशी माहिती जरांगे यांना यावेळी देण्यात आली. यानंतर जरांगे म्हणले की, मी इथे राजकारण करण्यासाठी आलो नाही. कुणी जर बेमुदत उपोषण करत असतील तर त्यांच्या वेदना मला माहित आहेत. मराठा आणि धनगर समाज याच्या मध्ये वाद नाही. राजकारणी ते लावत असतात. हा विषय गंभीर आहे. गिरीश महाजन साहेबांनी येथे नक्कीच भेट द्यावी. उपोषणकर्त्यांचं काय म्हणणं आहे, ते ऐकून घ्यावं. असे आवाहनही जरांगे यांनी यावेळी केले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhangar Reservationधनगर आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणlaturलातूर