तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्षपदी महेश हिप्परगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:21 IST2021-07-31T04:21:04+5:302021-07-31T04:21:04+5:30
तलाठी संघाचे राज्याध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी राज्य सरचिटणीस लक्ष्मीकांत काजे, मावळते जिल्हाध्यक्ष भीमाशंकर बेरुळे, सरचिटणीस ...

तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्षपदी महेश हिप्परगे
तलाठी संघाचे राज्याध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी राज्य सरचिटणीस लक्ष्मीकांत काजे, मावळते जिल्हाध्यक्ष भीमाशंकर बेरुळे, सरचिटणीस सुनील लाडके, मधुकर क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्षपदी महेश हिप्परगे यांची मतदानातून निवड झाली. निवडीसाठी लातूर तालुकाध्यक्ष विकास कतलाकुटे, रेणापूर तालुकाध्यक्ष दार्जिलिंग भुसनर, अहमदपूर तालुकाध्यक्ष कमलाकर पन्हाळे, जळकोट तालुकाध्यक्ष त्र्यंबक मुसळे आदींनी परिश्रम घेतले.
तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी परमेश्वर वैद्य, सरचिटणीस गोविंद शिंगडे, कार्याध्यक्ष त्र्यंबक चव्हाण, प्रशांत तेरकर, कोषाध्यक्ष तानाजी भंडारे, जिल्हा हिशेब तपासणी माधव जोशी, रवींद्र वाडेक, सल्लागार सुनील लाडके, विभागीय अध्यक्ष विकास बिराजदार, संजय घाडगे, अनिलकुमार उमाटे, ज्ञानेश्वर जाधव, उद्धव जाधव, जिल्हा संघटक गणेश भारती, सुरत स्वामी, अमोल रामशेटे, शंकर जाधव, मार्गदर्शक दिलीप देवकते, व्ही.व्ही. जाधव, महिला प्रतिनिधी माया येमले, अंबिका जोगदंड आदींची निवड करण्यात आली.