हेर येथे महाविकास आघाडीचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST2020-12-06T04:20:45+5:302020-12-06T04:20:45+5:30
... सोयाबीन नुकसानीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा किनगाव : अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरातील काही शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नव्हते. त्यामुळे सदरील ...

हेर येथे महाविकास आघाडीचा जल्लोष
...
सोयाबीन नुकसानीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
किनगाव : अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरातील काही शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नव्हते. त्यामुळे सदरील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार पाहणी करुन पंचनामे करण्यात आले. त्यातील काही शेतकऱ्यांना रोख रक्कम तर काहींना बियाणे मिळाले. मात्र, काही शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे. संपूर्ण खरीप हंगाम संपून रब्बी हंगामास सुरुवात झाली आहे. परंतु, भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
...
रेणापूर ग्रामीण रुग्णालयाचा आढावा
रेणापूर : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. तसेच विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी डॉ. जगदीश सूर्यवंशी, डॉ. आनंद कर्नावट, वैद्यकीय अधिकारी डॉ. सईद शेख, डॉ. भोसले उपस्थित होते. रुग्णालय व परिसराची पाहणी करुन डॉ. देशमुख म्हणाले, येथील ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता हे रुग्णालय अपुरे पडत आहे. रुग्णांना सुविधा मिळाव्यात यासाठी या रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्यासंदर्भातचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविणार असल्याचे सांगितले.
...
भादा येथील ग्रामदैवत श्री खंडोबाची यात्रा रद्द
औसा : तालुक्यातील भादा येथे चंपाषष्ठीनिमित्त होणारी ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी यांनी दिली. यात्रेसंदर्भात आयोजित बैठकीस माजी सरपंच बालाजी शिंदे, पांडुरंग कात्रे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील आदी उपस्थित हाेते. यंदा केवळ धार्मिक विधी पार पडणार आहेत. हा सोहळा साजरा करताना भाविकांनी फिजिकल डिस्टन्स राखणे आवश्यक आहे, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.