शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Maharashtra Election 2019 : लातुरात बंडोबा मैदानात; लढणार की नमणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 14:24 IST

काय घडते अन् काय बिघडते, याकडे सर्वांचेच लक्ष

लातूर : लातूर ग्रामीण, उदगीर, औसा, अहमदपूर या चारही मतदारसंघांत अखेर बंडोबा मैदानात आले असून, अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत नेमके काय घडते अन् काय बिघडते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़ दरम्यान, बंडोबा शेवटपर्यंत लढणार की, पक्षापुढे नमणार, हेही दोन दिवसांत कळणार आहे़ 

शेवटच्या दिवशी उदगीरमधून भाजपचे आ़ सुधाकर भालेराव यांनी कवड्याच्या माळा परिधान करून अपक्ष उमेदवारी दाखल केली़  त्यामुळे उदगीरमधील सामना चुरशीचा होणार आहे़ सलग दोन वेळा भाजपा तिकिटावर निवडून आलेले अपक्ष उमेदवार सुधाकर भालेराव, भाजप उमेदवार डॉ़ अनिल कांबळे व राष्ट्रवादीचे उमेदवार संजय बनसोडे यांच्यात तिरंगी लढत होईल़ 

लातूर ग्रामीण मतदारसंघातही काँग्रेसचे धीरज देशमुख, शिवसेनेचे सचिन रामराजे देशमुख आणि अपक्ष उमेदवार रमेश कराड अशी तिरंगी लढत अटळ आहे़ कराड यांनी दोन वेळा भाजपाकडून निवडणूक लढविलेली होती़ आता अचानकपणे मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे़ 

औशात बंडखोरीऔसा विधानसभा मतदारसंघही भाजपला सुटल्याने तेथे शिवसेनेचे माजी आ़ दिनकर माने, औशाचे माजी नगराध्यक्ष किरण उटगे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बजरंग जाधव यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019latur-city-acलातूर शहरlatur-rural-acलातूर ग्रामीणudgir-acउदगीरausa-acऔसाahmadpur-acअहमदपुर