प्रवासात सहा लाखांच्या दागिन्यांची बॅग हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:34 IST2020-12-16T04:34:58+5:302020-12-16T04:34:58+5:30

जळकाेट येथील काशीनाथ हनुमंत म्हेत्रे आणि त्यांचे कुटुंबीय देवदर्शन करून परत गावाकडे येत हाेते. दरम्यान, लातूर ते शिरूर ताजबंददरम्यानच्या ...

Lost six lakh jewelery bags on the journey | प्रवासात सहा लाखांच्या दागिन्यांची बॅग हरवली

प्रवासात सहा लाखांच्या दागिन्यांची बॅग हरवली

जळकाेट येथील काशीनाथ हनुमंत म्हेत्रे आणि त्यांचे कुटुंबीय देवदर्शन करून परत गावाकडे येत हाेते. दरम्यान, लातूर ते शिरूर ताजबंददरम्यानच्या मार्गावर जीपवर बॅग ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, ते वाटेत चहा घेण्यासाठी थांबले असता, अज्ञातांनी दाेरी कापली असावी. दाेरीने बांधलेल्या चारही बॅगा शिरूर ताजबंद येईपर्यंत रस्त्यात पडल्या. सदरच्या बॅगामध्ये जवळपास सहा लाख रुपयांचे साेन्याचे दागिने यासह इतर मौल्यवान वस्तू हाेत्या. आपल्या वाहनावरील कॅरिअरमधील बॅगा नाहीत हे शिरूर ताजबंद आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले. अधिक पाहणी केली असआ, काेणी तरी अज्ञाताने कॅरिअरची दाेरी चाकूने कापल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती जळकोट पोलिसांना त्यांनी दिली. शिवाय, रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पाेलीस कर्मचाऱ्यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. या बॅगांचा शाेध घेण्यात यावा, अशी मागणी काशीनाथ म्हेत्रे, आशिताेष म्हेत्रे यांनी केली आहे.

Web Title: Lost six lakh jewelery bags on the journey