हरवल्याची तक्रार ; गातेगाव ठाण्यात नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:19 IST2020-12-29T04:19:07+5:302020-12-29T04:19:07+5:30
घरासमोर थांबविलेली मोटारसायकल पळविली लातूर : शहरातील अवंतीनगर येथून दुचाकी चोरल्याची घटना १५ ते १६ डिसेंबरच्या रात्री घडली. याबाबत ...

हरवल्याची तक्रार ; गातेगाव ठाण्यात नोंद
घरासमोर थांबविलेली मोटारसायकल पळविली
लातूर : शहरातील अवंतीनगर येथून दुचाकी चोरल्याची घटना १५ ते १६ डिसेंबरच्या रात्री घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अज्ञातावर गुन्हा नोंद आहे. फिर्यादी रामदास शंकर बोराडे (वय ४५) यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच २४ एक्स ५८८९) घरासमोर थांबविली होती. दरम्यान, ती अज्ञात चोरट्यांनी पळविली. याबाबत एमआयडीसी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रस्त्याची दुरवस्था
लातूर : उदगीर तालुक्यातील डांगेवाडी येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर रस्ता पूर्णत: उखडला आहे. परिणामी, ग्रामस्थ, वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.
स्वच्छतेचा अभाव
लातूर : शहरातील फळ बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी सडलेली फळे दिसून येतात. परिणामी, दुर्गंधी पसरली आहे. येथील स्वच्छतेकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यातून फळविक्रेते, व्यापाऱ्यांना त्रास होत आहे. येथे स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.