लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:08 IST2021-08-02T04:08:46+5:302021-08-02T04:08:46+5:30

आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून अभिवादन लातूर येथे साहित्यरत्न, लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्यास आ. अभिमन्यू पवार यांनी ...

Lokshahir Annabhau Sathe Jayanti celebration | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून अभिवादन

लातूर येथे साहित्यरत्न, लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्यास आ. अभिमन्यू पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी आणि साहित्यप्रतिभेच्या माध्यमातून उपेक्षितांच्या, कामगारांच्या लढाईचा आवाज बुलंद केला, समाजमन जागृत केले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण फुंकले. असे प्रतिपादन आ. अभिमन्यू पवार यांनी येथे केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे, सतीश जाधव, मुकेश क्षीरसागर, शंकर शिंदे, दत्ता पुंड, विनोद जाधव, नगरसेविका मंजूषा हजारे, कल्पना डांंगे, अनंत पुंड, श्रामंत क्षीरसागर, रवी पेठाडे, जे. गायकवाड, अशुतोष कांबळे, अशोक देडे, सुनील बसपुरे, अनंत वैरागे, रवी क्षीरसागर, प्रवीण क्षीरसागर, रविशंकर केंद्रे, दत्ता चेवले यांची उपस्थित होती.

Web Title: Lokshahir Annabhau Sathe Jayanti celebration