शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : पुस्तक वाचून खिचडी शिजत नाही अन् चिठ्ठी वाचून देश चालविता येत नाही; दानवेंचे ‘खिचडी’पुराण चर्चेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 13:02 IST

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी चांगल्या आहेत. परंतु, देश चालविण्याची त्यांची कुवत नाही.

लातूर : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी चांगल्या आहेत. परंतु, देश चालविण्याची त्यांची कुवत नाही. चिठ्ठी वाचल्याशिवाय त्यांना भाषण येत नाही, अशी टीका करीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी लातुरात आयोजित सभेत ‘खिचडी पुराण’ सांगून कार्यकर्त्यांचे मनोरंजन केले. 

दानवे म्हणाले, पुस्तक वाचून खिचडी होत नाही, तसे चिठ्ठी वाचून देश चालविता येत नाही. माझ्याच घरात पत्नीला स्वयंपाक येत नव्हता. त्यामुळे मी तिला दोन महिने माहेरी पाठवून स्वयंपाक शिकून परत ये म्हणालो. दोन महिन्यांनी ती आली. मी तिला खिचडी करायला सांगितले. तिने पुस्तक काढले. त्यात लिहिल्याप्रमाणे अडीचशे ग्रॅम तांदूळ, अडीचशे ग्रॅम डाळ, मीठ, हळद, मिरची टाकले. पातेले झाकून ठेवले. अर्धा तास वेळ दिला. उघडून पाहिले तर खिचडी शिजली नव्हती. कारण स्टोव्हच सुरू केला नव्हता, असे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. या कथेचे निरूपण करताना दानवे यांनी वाचून केल्या जाणाऱ्या भाषणाची खिल्ली उडविली.

नायडू, मायावती, बॅनर्जी, अब्दुल्ला यांचे तोंड खरकटे चंद्राबाबू नायडू, बसपा नेत्या मायावती, ममता बॅनर्जी, उमर अब्दुल्ला हे नेते एकेकाळी आमच्यासोबत होते. ते आमच्या पंक्तीत जेऊन गेले. त्यांचे तोंड अद्याप खरकटे आहे अन् तेच आमच्यावर जातीयवादाचा आरोप करतात, अशी टीका दानवेंनी केली.

दानवेंचे माध्यमांवर खापर पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले आणि त्या बदल्यात आपण त्यांचे ४०० अतिरेकी मारले, असे वादग्रस्त विधान केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आलेले रावसाहेब दानवे म्हणाले, मी सैनिकांसंदर्भाने चुकीचा उल्लेख केलेला नाही. माध्यमांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला. चुकीची माहिती लोकांसमोर दिली, असे स्पष्ट करीत त्यांनी माध्यमांवर खापर फोडले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaosaheb Danweरावसाहेब दानवेlaturलातूरBJPभाजपा