शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

lok sabha election 2019 : काँग्रेस, भाजपच्या उमेदवारीचा संभ्रम अद्यापही कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:46 IST

काँग्रेसकडे ५० पेक्षा अधिक जणांनी उमेदवारीची मागणी केली असली तरी त्यांना योग्य उमेदवार अद्याप मिळाला नाही

- हणमंत गायकवाड 

लातूर : प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेली काँग्रेस आणि सद्य:स्थितीत भाजपाकडे असलेल्या लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात अर्ज दाखल करण्याची वेळ आली तरी दोघांनाही उमेदवार निश्चित करता आलेला नाही. 

काँग्रेसकडे ५० पेक्षा अधिक जणांनी उमेदवारीची मागणी केली असली तरी त्यांना योग्य उमेदवार अद्याप मिळाला नाही अन् विद्यमान खासदार भाजपाचाच असताना त्यांनाही उमेदवारीवर शिक्कामोर्तब करता आलेले नाही. काँग्रेसकडे प्रारंभापासूनच उमेदवारी कोणाला, हा प्रश्न होता. मात्र अंतिम निर्णय झाला नाही. भाजपचे विद्यमान खा.डॉ. सुनील गायकवाड हे  उमेदवार राहणार नाहीत, अशी व्यूहरचना पक्षातच आखली गेली. मोठे मताधिक्य मिळविलेल्या विद्यमान खासदारांना भाजपातील स्थानिकांनी डावलण्याचा जो डाव आखला, त्याने काँग्रेसजन सुखावले. परंतु काँग्रेसलाही लढत देईल असे नाव अखेरपर्यंत स्पष्ट करता आले नाही. काँग्रेसकडून डॉ. शिवाजी काळगे, पृथ्वीराज सिरसाट, भा.ई. नगराळे या तिघांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय, मच्छिंद्र कामत यांचेही नाव स्पर्धेत आले आहे. परंतु निर्णय होत नसल्याने संभ्रमावस्था आहे.

अशीच स्थिती सत्ताधारी पक्षाचीही असून, खा.डॉ. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव ही नावे मागे टाकून सुधाकर शृंगारे यांचे नाव पुढे आणले आहे. लोकसभेतील कामकाज आणि वरिष्ठ स्तरावर समाधानकारक कामाची नोंद असली, तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांतील रोषामुळे विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार नाही, असा अंदाज पक्षांतर्गत वर्तविला जात आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बूथ पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात एका गटाने विरोध दर्शविल्याने खासदारांना डावलले जाईल, याची कुणकुण लागली होती. दरम्यान, वंचित आघाडीने मात्र १५ दिवसांपूर्वी माजी शिक्षणाधिकारी राम गारकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 

राजकीय आखाडा रंगणारकाँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोणी का असेना, राजकीय आखाडा रंगणार आहे तो पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख यांच्यात. काँग्रेसचा प्रदीर्घ काळ गड राहिलेला लातूर लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून मिळविण्यासाठी आमदार अमित देशमुख व्यूहरचना आखतील, तर पालकमंत्री संभाजी पाटील मतदारसंघावर आपलीच पकड मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहतील. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाlaturलातूर