जिल्ह्यात पशुधन लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:33 IST2020-12-05T04:33:03+5:302020-12-05T04:33:03+5:30
कृषी विज्ञान केंद्र; शेतकऱ्यांना मार्गदर्शन लातूर : मांजरा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कडधान्य पीक प्रात्यक्षिक अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले ...

जिल्ह्यात पशुधन लसीकरण मोहीम
कृषी विज्ञान केंद्र; शेतकऱ्यांना मार्गदर्शन
लातूर : मांजरा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कडधान्य पीक प्रात्यक्षिक अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. सुधारित वाणाबद्दल माहिती देण्यात येत आहे. यावेळी शेतकरी रामेश्वर माळी, कृषी विद्यातज्ज्ञ पी.डी. मताई, एस.बी. देशमुख, एस.बी. बेद्रे आदींसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सामूहिक शेतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रीन लातूर वृक्ष टीमतर्फे वृक्षारोपण मोहीम
लातूर : शहरातील ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने इंद्रायणी काॅलनीमध्ये वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यावेळी डाॅ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, गंगाधर पवार, ॲड. वैशाली यादव-लोंढे, सुलेखा कारेपूरकर, प्रमोद निपाणीकर, कल्पना फरकांडे, मनमोहन डागा, ऋषिकेश दरेकर, ऋषिकेश पोद्दार आदींसह सदस्यांची उपस्थिती होती.
तुरीवर रोगाचा प्रादुर्भाव
लातूर : जिल्ह्यात सध्या तुरीच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. खरीप हंगामाच्या शेवटी जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी फवारणी केली असली तरी अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे तुरीचे पीक धोक्यात आले आहे.
वाहतुकीस अडथळा
लातूर : शहरातील पाच नंबर चौकात सायंकाळच्या वेळी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अवजड वाहनांची रेलचेल असल्याने दुचाकी चालकांची गैरसोय होत आहे. याकडे शहर वाहतूक शाखेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त लष्करेंचा सत्कार
लातूर : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दहावी परीक्षेत ६६ टक्के गुण मिळविणाऱ्या ब्रह्मदेव लष्करेचा प्रहार अपंग क्रांती संघटना व अत्रीवरद प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. विनोद चव्हाण, उद्धवराव जाधव, वैशालीताई डांगे, नितीन देशमुख यांची उपस्थिती होती. ब्रह्मदेव याने दोन्ही हात नसताना पायाच्या बोटांनी लिहून यश मिळविले.
दिव्यांग दिन साजरा
लातूर : येथील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य कर्नल एस.ए. वर्धन, प्रवीण शिवणगीकर, विक्रम माने, विद्या साळवे, अमित होनमाळे, सतीश जाधव, सुनील मुनाळे, विवेक डोंगरे, असिद बनसोडे उपस्थित होते.
रस्त्यावर पार्किंग
लातूर : एमआयडीसी परिसरातील रिंग रोडवर रस्त्यावर पार्किंग केली जात आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा किरकोळ अपघातही होत असल्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सहसंचालक डाॅ. टेंबेकर यांचा सत्कार
लातूर : दयानंद कला महाविद्यालय येथे उच्च शिक्षण सहसंचालक डाॅ. नलिनी टेंबेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डाॅ.एस.पी. गायकवाड, डाॅ. जयप्रकाश दरगड, डाॅ. श्रीराम सोळुंके, डाॅ. अंजली जोशी, डाॅ. सुनीता सांगोले, अनिलकुमार माळी, डाॅ. दिलीप नागरगोजे, नवनाथ भालेराव, धनराज जोशी, रमेश देशमुख, निर्मला दहिरे, चंद्रकला आदमाने आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
समन्वयक पॅनलसाठी मुलाखतीचे आयोजन
लातूर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत लातूर उपविभागात सूक्ष्म नियोजन ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी समन्वयकाचे पॅनल तयार करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ७ डिसेंबर रोजी आत्मा प्रकल्प संचालक कार्यालय प्रशासकीय इमारत लातूर येथे सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी लातूर यांनी केले आहे. सोबत येताना बायोडाटा, शैक्षणिक अर्हता कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सोबत आणणे आवश्यक असल्याचे सांगितले.
‘राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी व्हावे’
लातूर : माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. शिक्षकांना आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्यांमार्फत निबंध, शिक्षण मंडळ कार्यालय पुणे किंवा विभागीय मंडळ कार्यालय येथे १५ जानेवारीपर्यंत पाठवावेत. या स्पर्धेत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
ऑनलाईन अभ्यासक्रम उपक्रमाला प्रतिसाद
लातूर : कोरोनाच्या संकटामुळे प्राथमिक शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण उपक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यात जवळपास दोन हजारांहून अधिक शाळा आहेत. काही शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने तासिका घेतल्या जात आहेत. तर काही ठिकाणी व्हाॅटस्ॲप ग्रुपच्या माध्यमातून अभ्यासमालिका दिली जात आहे. तसेच कोविड कॅप्टन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाच्या वतीने नववी, दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले असून, शासन नियमानुसार उपाययोजनांचे पालन केले जात असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.