शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

उदगीरमध्ये आजपासून सारस्वतांचा मेळा; शरद पवार यांच्या हस्ते अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 07:27 IST

आयोजक संस्थेने उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्याचा देखावा असलेले प्रवेशद्वार केले आहे. इ. स. १७६० मध्ये उदगीर येथे निजाम व मराठे यांच्यात लढाई झाली. यात मराठ्यांचा विजय झाला.

उदगीर (जि. लातूर) :  तीन भाषांच्या जननीचे माहेरपण आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या उदयगिरी नगरीत शुक्रवारपासून सारस्वतांचा मेळा भरत आहे. ९५ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, ज्ञानपीठ विजेते दामोदर मावजो, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, सा.बां. मंत्री अशोक चव्हाण, उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आदि मान्यवरही यावेळी उस्थित असतील. 

उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्याचे प्रवेशद्वारआयोजक संस्थेने उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्याचा देखावा असलेले प्रवेशद्वार केले आहे. इ. स. १७६० मध्ये उदगीर येथे निजाम व मराठे यांच्यात लढाई झाली. यात मराठ्यांचा विजय झाला.

मराठ्यांचे नेतृत्व करणारे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी सैन्य घेऊन पानिपत स्वारी केली. पानिपतच्या लढाईची सुरुवात उदगीरपासून झाल्यामुळे उदगीरचा किल्ला व येथे झालेल्या लढाईचे महत्त्व आहे. यामुळेच संमेलनाचे प्रवेशद्वार उदगीरच्या किल्ल्याचे करण्यात आले.

जर्मन बनावटीचा मंडप - सध्या शहरातील तापमान ४१ अंश सेल्सिअसवर आहे. उदयगिरी मैदानावरील वातावरणही तापले आहे. - सभामंडपात गर्दीमुळे उकाडा वाढेल. आयोजकांनी याची काळजी घेत उष्मा रोखणारा जर्मन हँगर बनावटीचा भव्य मंडप उभारला आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा २३ एप्रिल रोजीचा नियोजित नागपूर दौरा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्याने साहित्य संमेलनाला ते उपस्थित राहू शकणार नाहीत. 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस