परिवर्तनाची ठोस भूमिका साहित्याने घेतली पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST2021-08-14T04:24:12+5:302021-08-14T04:24:12+5:30
उदगीर : जागतिकीकरणाची प्रक्रिया प्राचीन आहे. ती परंपरेने चालत ब्रिटीश काळापर्यंत सुरू राहिली. भारतात ब्रिटीश कालखंडात जागतिकीकरण सुरू होते. ...

परिवर्तनाची ठोस भूमिका साहित्याने घेतली पाहिजे
उदगीर : जागतिकीकरणाची प्रक्रिया प्राचीन आहे. ती परंपरेने चालत ब्रिटीश काळापर्यंत सुरू राहिली. भारतात ब्रिटीश कालखंडात जागतिकीकरण सुरू होते. १९६०नंतर साहित्य प्रवाह बदलले. १९८०मध्ये अर्थकारणाचा परिणाम झाला. त्यामुळे भाषा व साहित्यात बदल होत गेले. परिवर्तनाची ठोस भूमिका साहित्याने घेतली पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी व्यक्त केले.
येथील शिवाजी महाविद्यालय व स्वारातीम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी विभागाने ‘जागतिकीकरण आणि मराठी साहित्य : प्रभाव, परिणाम व आव्हाने’ या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राचे उद्घाटन कि. शि. प्र. मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डाॅ. विनायकराव जाधव होते. यावेळी बीजभाषण डॉ. साहेब खंदारे यांचे झाले.
शोधनिबंध वाचन सत्राच्या अध्यक्षस्थानी उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के होते. दहा शोधनिबंध यावेळी सादर करण्यात आले. यावेळी डॉ. मस्के म्हणाले की, जागतिकीकरणाने मनुष्याची जगण्याची पद्धत बदलली. जागतिकीकरणात पैसा मोठा व माणूस छोटा झाला. कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली. संवेदनशील साहित्यिकांनी या घटना व घडामोडींची नोंद घ्यायला हवी. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे उपस्थित होते. समारोपावेळी सहयोगी प्रा. डॉ. स्नेहा महांबरे, सहयोगी प्रा. डॉ. पी. विठ्ठल, कि. शि. प्र. मंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील राजूरकर, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जगताप उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सुरेश शिंदे यांनी, सूत्रसंचालन प्रा. देविदास गायकवाड यांनी केले. सहसंयोजक डॉ. नरसिंग कदम यांनी आभार मानले. तंत्रसाह्य ग्रंथपाल डॉ. विष्णू पवार यांनी केले.