सुन, नातवाने केला महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:15 IST2021-06-06T04:15:24+5:302021-06-06T04:15:24+5:30
पोलीस उपाधीक्षक डॉ. कोल्हे पत्रपरिषदेत म्हणाले, तालुक्यातील उमरगा (हा.) येथील शिवाजी माने हे आपली आई रुक्मिणबाई, पत्नी ललिताबाई व ...

सुन, नातवाने केला महिलेचा खून
पोलीस उपाधीक्षक डॉ. कोल्हे पत्रपरिषदेत म्हणाले, तालुक्यातील उमरगा (हा.) येथील शिवाजी माने हे आपली आई रुक्मिणबाई, पत्नी ललिताबाई व मुलगा गणेश यांच्यासोबत राहतात. शिवाजी माने हे पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत. शुक्रवारी सायंकाळी अचानक त्यांच्या आई रुक्मिणबाई यांना उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्या मयत असल्याचे सांगून पोलिसांना खबर दिली. त्यावरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
शवविच्छेदनानंतर शिवाजी माने यांच्या फिर्यादीवरून शनिवारी पत्नी ललिताबाई व मुलगा गणेश या दोघांनी संगनमत करून मला शिवीगाळ करून धमकी देत. तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या आईवर पैसे खर्च का करता. आम्हाला पैसे देत नाही. तुमच्या आईला येथे ठेवायचे नाही, तिला कुठेही घेऊन जावा, असे म्हणत पत्नी व मुलाने माझ्या आईला ठार मारले. त्यावरून निल़ंगा पोलिसांत पत्नी व मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली असल्याचे पोलीस उपाधीक्षक डॉ. दिनेश कोल्हे म्हणाले. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक यु.एस. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर हे करीत आहेत.