शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सुनेवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप; ६ जणांची साक्ष ठरली महत्त्वपूर्ण

By राजकुमार जोंधळे | Updated: March 8, 2024 18:42 IST

लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

लातूर : सुनेवर अत्याचार केल्याप्रकरणी सासऱ्याला लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेप आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा सश्रम कारावास, त्याचबराेबरच कलम ५०६ भादंवि अन्वये याच गुन्ह्यात दोन वर्षे सश्रम कारावास व २५ हजारांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे.

२०१९ मध्ये सुनेवर सासऱ्याकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. दरम्यान, पीडित महिलेच्या फिर्यादीवरून भादा पाेलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७५ / २०१९ कलम ३७६, २ (एन) ३१५, ३२३, ३४ भादंविप्रमाणे सासऱ्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पवार, पोलिस उपनिरीक्षक बावकर यांच्या पथकाने केला. तपासामध्ये प्रमुख साक्षीदार, अनेक सबळ पुरावे शोधून न्यायालयात आरोपीविराेधात दोषारोपपत्र दाखल केले होते.

पीडिता ही घरात एकटीच असताना तिला तुझे कुऱ्हाडीने तुकडे करतो, अशी धमकी देऊन सासऱ्याने अत्याचार केला. घडला प्रकार पीडित महिलेने पती आणि सासूला सांगितला असता त्यांनी आमची बदनामी करायची नाही, असे सुनावले. त्यानंतरही आरोपी सासऱ्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केला. अखेर याबाबत भादा पोलिस ठाण्यात पीडितेची सासू, सासरा आणि पतीविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहायक पाेलिस निरीक्षक पवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान, न्यायालयात हा खटला सुरू असताना पीडितेच्या पतीचे निधन झाले.

न्यायालयात ६ जणांची साक्ष ठरली महत्त्वपूर्ण...खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण ६ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. पीडित महिला आणि साक्षीदारांची साक्ष, त्याचबराेबर सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आरोपी सासऱ्याला जन्मठेप आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास भाेगावा लागणार आहे. दंडाची रक्कम नुकसानभरपाई म्हणून पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जयश्री उत्तमराव पवार, ट्रायल मॉनिटरिंग सेलचे सहायक पाेलिस निरीक्षक धनंजय ढोणे, महिला पोलिस अमलदार कोरे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर