वाहतूक नियम माेडणाऱ्या लायसन्स हाेऊ शकते रद्द !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST2021-09-13T04:19:50+5:302021-09-13T04:19:50+5:30

लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील प्रमुख मार्ग, चाैका-चाैकात वाहन तपासणी माेहीम हाती घेतली जाते. दरम्यान, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन ...

Licenses violating traffic rules may be revoked! | वाहतूक नियम माेडणाऱ्या लायसन्स हाेऊ शकते रद्द !

वाहतूक नियम माेडणाऱ्या लायसन्स हाेऊ शकते रद्द !

लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील प्रमुख मार्ग, चाैका-चाैकात वाहन तपासणी माेहीम हाती घेतली जाते. दरम्यान, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ई-चलन फाडले जाते. ऑनलाईन पद्धतीने दंड केला जात आहे. डिसेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२१ या कालवधीत तब्ब्ल १७ हजार ६५६ वाहनधारकांना वाहतूक नियम माेडल्याप्रकरणी ई-चलन फाडण्यात आले आहे. त्यांना १ काेटी ५६ लाख ४१ हजार २०० रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला आहे. यातील १ हजार ७९४ वाहनधारकांनी १५ लाख ३५ हजार ६०० रुपयांचा दंड भरला असून, १५ हजार ८६२ वाहनधारकांनी १ काेटी ४१ लाख ५ हजार ६०० रुपयांचा दंड भरला नाही.

हे नियम माेडल्यास लायसन्सचे निलंबन...

वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे यासह इतर नियमांचे उल्लंघन करणे.

कलम - ६६ / १९२ चे उल्लंघन करणे, भरधाव वेगात वहन चालविणे, अपघाताला कारणीभूत ठरणे. शिवाय, चालकाच्या हातून घडलेल्या अपघातात अधिक जीवितहानी हाेण्याची घटना घडणे.

वारंवार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे चालकांना महागात पडणार आहे. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे, चाेरट्या मार्गाने अवैध वाहतूक करणे, हे कारणही लायसन्स निलंबनासाठी कारणीभूत आहे.

अशी हाेते कारवाई...

वारंवार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाचे लायसन्स निलंबित केले जाते. यासाठी पहिल्यांदा काही काळासाठी परवाना निलंबित केला जाते. या कालावधीत त्याच्याकडून पुन्हा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाले, गंभीर गुन्हा घडला तर त्याचे लायसन्स कायम स्वरुपासाठी निलंबित केले जाते. यासाठी आता प्रत्येक चालकांचा डाटा एका क्लिकवर उपलब्ध आहे.

आधी तीन महिने नंतर कायमस्वरुपी...

एखाद्या वाहनचालकाने सतत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्याच्या हातून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यांचे लायसन्स पहिल्यांदा तीन महिन्यासाठी निलंबित केले जाते. या काळात चालकाच्या वर्तवणुकीमध्ये सुधारणा झाली तर पुन्हा परिवहन विभागाच्या वतीने लायसन्स दिले जाते. जर चालकांमध्ये कुठलीही सुधारणा झाली नाही. पुन्हा गंभीर चुका हातून घडल्या तर त्याचे लायसन्स कायमस्वरुपासाठी निलंबित केले जाते.

नियम माेडणाऱ्या वाहनधारकांची माेठी संख्या...

लातूर शहर, जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या काही वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन हाेत असल्याचे समाेर आले आहे. यामध्ये वेगाची मर्यादा ओलांडणे, सीट बेल्टचा वापर न करणे, सिग्नल ताेडणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, ट्रीपल सीट, हेल्मेट न वापरणे, माेबाईलवर बाेलणे, साेबत लायसन्स, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे आदी प्रकार सातत्याने घडत आहेत. अशांना दंड ठाेठावला जात आहे.

- पाेनि. सुनील बिर्ला, शहर वाहतूक शाखा, लातूर

Web Title: Licenses violating traffic rules may be revoked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.