राज्याच्या सहकार क्षेत्रात अगळावेगळा पॅटर्न निर्माण करु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:37 IST2021-02-28T04:37:41+5:302021-02-28T04:37:41+5:30
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ग्राम पंचायतीच्या वतीने आयाेजित सत्कार साेहळ्यात ते बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी सुभाष पाटील हाेते. तर ...

राज्याच्या सहकार क्षेत्रात अगळावेगळा पॅटर्न निर्माण करु
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ग्राम पंचायतीच्या वतीने आयाेजित सत्कार साेहळ्यात ते बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी सुभाष पाटील हाेते. तर यावेळी माजी सरपंच साहेबराव जाधव, जिल्हा परिषदेचे गटनेते मंचकाराव पाटील, डॉ. सुनील पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख, जि.प.सदस्य माधव जाधव, सभापती शिवानंद हेंगणे, पं. स. सदस्य सुशिला भातिकरे, पोलीस पाटील उत्तम वाघमारे, निवृत्ती कांबळे, बालाजी सारोळे, तुळशीराम भोसले, सरपंच सावित्रीताई पडोळे, सुरज पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती. आमदार पाटील म्हणाले, सहकाराविना विकास नाही, पणन महासंघात नियोजन, अधिकारी-कर्मचारी आणि शासन यांच्यामध्ये समन्वय साधत महामंडळाच्या कामाला
गती दिली जाणार आहे. यातून शेतकऱ्यांना, सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहाेत. मतदारसंघातील कुणाचीही गैरसोय होणार नाही, ती खपवून घेणार नाही. त्यासाठी मी कटीबद्ध आहे. कार्यक्रमाच यशस्वीतेसाठी कोंडीबा पडोळे, विजय विक्रम भोसले, रणधीर पाटील, राहूल वाघमारे, जयंत सगर, गजानन वलसे, इस्माईल शेख, विठ्ठल बिलापट्टे, खुर्शिदबेगम किनीवाले, पुष्पा जवळगे, सुनंदा वलसे, रेखा जाधव, परविन किनीवाले, शोभा महाके, उषाताई वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ : शिरूर ताजबंद ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे नूतन चेअरमन आ. बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष पाटील, साहेबराव जाधव, सरपंच सावित्रीताई पडोळे, पोलीस पाटील उत्तम वाघमारे यांची उपस्थिती हाेती.