एशिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये लातूरची लावण्यवती सृष्टी जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:26 IST2021-02-05T06:26:03+5:302021-02-05T06:26:03+5:30
कोरोना काळात केली प्रॅक्टीस... कोराना काळामध्ये सृष्टीने लावणी नृत्याची प्रॅक्टीस केली होती. एशिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉडमध्ये स्थान मिळवायचेच ...

एशिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये लातूरची लावण्यवती सृष्टी जगताप
कोरोना काळात केली प्रॅक्टीस...
कोराना काळामध्ये सृष्टीने लावणी नृत्याची प्रॅक्टीस केली होती. एशिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉडमध्ये स्थान मिळवायचेच असे स्वप्न होते. त्यानुसार मेहनत घेतली. तीन वेळा रंगीत तालीम करण्यात आली. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नामध्ये तिने रेकॉर्ड केले आहे. आई संजीवनी जगताप आणि वडील सुधीर जगताप हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. आई-वडीलांनी सृष्टीची लावणी नृत्यातील आवड लक्षात घेऊन विक्रमासाठी प्रोत्साहन दिले.
लातुरकरांचा आशिर्वाद...
माझ्या आई-वडीलांची साथ, लातुरकरांचे आशिर्वाद आणि कठीण मेहनतीने मी हा विक्रम प्रस्थापित केला आहे. मला कुठलाही त्रास झाला नाही. परंतू, माझ्या काळजीपोटी घरच्यांना त्रास झाला. मी यापूर्वी तीन वेळा कोरोनाकाळात रंगीत तालीम केली होती. या मेहनतीला यश आले, खुप आनंद झाला. - सृष्टी जगताप
फोटो : २७एलएचपी सृष्टी जगताप