जी. श्रीकांत म्हणाले, लातूर जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाऊल टाकले. गंजगोलाईतील अतिक्रमण काढण्यात आले. व्यापाऱ्यांनी आलटूनपालटून दुकाने उघडावीत, याबाबत आपण निर्णय घेतला होता. लॉकडाऊन जाहीर झाले होते. त्यामुळे व्यावसायिक तसेच व्यापाऱ्यांनी नियमित व्यवसायात गुंतून न पडता आपल्या परिवारासह आनंद घ्यावा. पुढील कामे नवे सहकारी निश्चितच पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले, लातूरकरांनी एकत्रित येऊन कोणताही बंद पाळायचा नाही, असा ठराव घेतल्यास येणाऱ्या काळात लातूरच्या लौकिकात मोलाची भर पडेल. एखादी घटना घडल्यास त्याकडे कसे पहायचे हे व्यापारी वर्गाकडून शिकण्यासारखे आहे असे सांगून त्यांनी लातूरकरांना जी. श्रीकांत यांची उणीव कधीही भासू देणार नसल्याचे सांगितले. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी, विनोद गिल्डा, विश्वनाथ किनीकर, भारत माळवदकर, अरुण सोमाणी, विश्वनाथ किनीकर, राजेश फडकुले, दत्तात्रय पत्रावळे, रामदास भोसले, प्रदीप सोनवणे, चंदू बलदवा, नंदकिशोर अग्रवाल, धनंजय बेंबडे, कमल जोधवानी, रामेश्वर भराडिया, राघवेंद्र ईटकर, रामेश्वर पुनपाळे, बस्वराज मंगरुळे, सचिन कोचेटा, कमलकिशोर अग्रवाल, हेमंत भावसार, राजकुमार डावळे, पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती होती.
जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील...
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू. विकासात व्यापाऱ्यांचा वाटा मोठा असतो. व्यापारी व प्रशासनात चांगला समन्वय राहील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.