लातूरकरांचे आरोग्य धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:33 IST2021-02-06T04:33:41+5:302021-02-06T04:33:41+5:30

ज्या ज्या ठिकाणी कचरा जाळलेली राख दिसून येईल, तिथले ऑडिट झाले पाहिजे. संबंधित बेजबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, ...

Laturkar's health in danger! | लातूरकरांचे आरोग्य धोक्यात !

लातूरकरांचे आरोग्य धोक्यात !

ज्या ज्या ठिकाणी कचरा जाळलेली राख दिसून येईल, तिथले ऑडिट झाले पाहिजे. संबंधित बेजबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी डॉ. विनोद लड्डा यांनी केली आहे.

प्लास्टीक, वायर, कप, कागद सगळे काही जळते...

रस्त्यावर प्लास्टीक, तांबं काढण्यासाठी वायर, थर्माकोल कप, केमिकलचे कपडे अशा अनेक प्रकारच्या वस्तू जाळल्या जातात.

दोष कोणाचा?

कचरा जाळण्याबाबत महापालिकेला दोष देऊन सर्वजण मोकळे होतात. परंतु, छोटे-छोटे ढिगारेही दररोज जाळले जातात. त्या-त्या परिसरातील नागरिकांनीही जागरुकपणे हे थांबविले पाहिजे. जळालेल्या कचऱ्याून विषारी वायू आणि धूर वातावरणात पसरत आहे. ज्यामुळे कर्करोग, यकृताचे आजार, मेंदूविकार, अस्थमा होण्याची दाट शक्यता असते. फोमकप्स जाळल्याने स्टायरीन वायू निघून त्वचा आणि फुफ्फूसावर वाईट परिणाम होतो. त्वचा काळवंडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे याचा त्रास होतो. गर्भवती महिला, वृद्ध व लहान मुलांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होत आहे.

- डॉ. विनोद लड्डा

प्रदूषण नियंत्रण मंडळ, मनपा, एमआयडीसी कारवाई करणार

मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी महापालिकेचे पथक करून संबंधितांना प्रथम समज देऊ. त्यानंतरही कचरा जाळला तर दंडात्मक कारवाई होईल. त्यानंतरही पुनरावृत्ती झाली तर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी शेळके व एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय कौसडीकर यांनी औद्योगिक क्षेत्रात कचरा जाळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Laturkar's health in danger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.