Latur ZP Election Result 2026: आज राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून, मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लातूर जिल्हा परिषदेत अनपेक्षित यश मिळवत तीन जागांवर विजय मिळवला आहे. या निकालांमुळे मराठवाड्यातील राजकारणात मनसेचा प्रवेश झाला आहे.
लातूर जिल्हा परिषदेत मनसेचे इंजिन धावले...
रेणापूर तालुका – पानगाव जिल्हा परिषद गट: मनसेचे उमेदवार डॉ. सुनील नागरगोजे विजयी.
पंचायत समिती निवडणूक:
पानगाव: मोनिका रवी सूर्यवंशी (मनसे)
कोस्ट गाव: श्रीदेवी गालफाडे (मनसे)
या विजयासह मनसेचे ‘इंजिन’ लातूरमध्ये धावल्याचे दिसून येत आहे.
मुख्य लढत काँग्रेस-भाजपमध्ये
लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने ३६ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. यंदा काँग्रेसचे अमित देशमुख आणि भाजपचे संभाजीराव निलंगेकर पाटील व अभिमन्यू पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. मात्र, मनसेच्या उमेदवारांनी अनपेक्षित यश मिळवत दोन्ही प्रमुख पक्षांना धक्का दिला.
इतर प्रमुख निकाल (प्राथमिक माहिती)
लातूर तालुका – महाराणा प्रताप नगर गट: काँग्रेसचे महादेव मस्के विजयी
भातांगळी गट: भाजपचे पांडुरंग बालवाड विजयी
अहमदपूर तालुका – खंडाळी गट: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या शितल खोमणे विजयी
जळकोट तालुका – वांजरवाडा गट: अपक्ष उमेदवार धर्मपाल देवशेट्टे विजयी
आर्वी गट: काँग्रेसच्या राजश्री देशमुख विजयी
लातूर तालुक्यातील दोन्ही पंचायत समित्या: काँग्रेसच्या ताब्यात
मतमोजणी अद्याप सुरू असून, अंतिम आणि अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. मात्र, मनसेच्या या ‘सरप्राइज’ विजयाने मराठवाड्यातील राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Web Summary : MNS unexpectedly won three seats in Latur Zilla Parishad elections, marking their entry into Marathwada politics. Congress and BJP faced setbacks. Counting continues.
Web Summary : मनसे ने अप्रत्याशित रूप से लातूर जिला परिषद चुनावों में तीन सीटें जीतीं, जिससे मराठवाड़ा की राजनीति में उनकी एंट्री हुई। कांग्रेस और भाजपा को झटका। मतगणना जारी है।