लातूर वूमेन प्रीमिअर क्रिकेट लीगला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST2021-03-07T04:18:29+5:302021-03-07T04:18:29+5:30
लातूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजर्षी शाहू महाविद्यालय व डाॅ. आम्रपाली अभयसिंह देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ...

लातूर वूमेन प्रीमिअर क्रिकेट लीगला सुरुवात
लातूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजर्षी शाहू महाविद्यालय व डाॅ. आम्रपाली अभयसिंह देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी लातूर वूमेन क्रिकेट लीग स्पर्धेला सुरुवात झाली.
या स्पर्धेत चार महिला संघांनी सहभाग नोंदविला असून, यात क्रेझी वूमेन, पीएसजी लातूर वाॅरियसर्स, चक दे इंडिया व शाहू सुपर वूमेन या संघांचा समावेश आहे. स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डाॅ. गोपाळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून लातूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, तालुका क्रीडाधिकारी मीरा रायबान, प्राचार्य डाॅ. महादेव गव्हाणे, प्राचार्य बी.ए. मैंदर्गी, क्रीडाधिकारी कृष्णा केंद्रे यांची उपस्थिती होती.
या स्पर्धा बार्शी रोडवरील राजर्षी शाहू क्रीडा संकुलात होत असून, रविवारी साखळी सामन्यांसह अंतिम सामना रंगणार आहे. विजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. यानिमित्ताने पुरुषांच्याही क्रिकेट लीग स्पर्धा घेण्यात आल्या.
यशस्वीतेसाठी प्रा. अनिरुद्ध बिराजदार, रत्नराणी कोळी यांच्यासह शिवछत्रपती शिक्षण संस्थेतील कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
महिला सबलीकरणासाठी या स्पर्धेचे शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या क्रीडा विभागामार्फत आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा लीग पद्धतीने होत असून, महिला क्रिकेटपटूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. साखळी स्पर्धेतील पहिल्या फेरीचे सामने शनिवारी घेण्यात आले. महिला सबलीकरणासाठी या स्पर्धेचे शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या क्रीडा विभागामार्फत आयोजन करण्यात आले आहे.