शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Latur: बसच्या धडकेत भाजी विक्रेता शेतकरी जागीच ठार, औसा टी-पाँईटवर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:08 IST

औसा टी-पाँईंटवर सर्व्हिस रोड नसल्याने दररोज अपघात होत आहेत.

- संदीप शिंदे

औसा ( लातूर) : शहरातील टी-पाँईटवर गुरुवारी सकाळी ६.४० वाजता बसस्थानकाकडे वळण घेत असलेल्या एसटी बसला भरधाव वेगातील ट्रकने जोराची धडक दिली. यात एसटी बस रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजी विक्रेता शेतकऱ्याच्या अंगावर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तुकाराम बाजीराव जाधव (वय ५५ रा. करजगाव, ता. औसा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

लातूरहून मेढा (जि. सातारा) आगाराची बस (एमएच १४ एल.एक्स. ५७३४) ही साताऱ्याकडे निघाली होती. गुरुवारी सकाळी ६.४० वाजता बस औसा टी-पाँईंटवर आली असता गावातील बसस्थानकाकडे वळाली. यावेळी तुळजापूर मोडवरुन भरधाव येणाऱ्या ट्रकने बसच्या मागील बाजूला जोराची धडक दिली. यात एसटी बस रस्त्याच्या कडेला भाजीविक्रीसाठी बसलेले शेतकरी तुकाराम जाधव यांच्या अंगावर गेली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरांनी मयत घोषित केले. औसा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाल्याने त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

बसमधील प्रवासी सुखरूप...दररोज सकाळी ६ वाजता लातूरहून औसामार्गे सातारा येथे बस जाते. गुरुवारी अपघात झालेल्या बसमध्ये १३ प्रवासी होते. बसचा वेग कमी असल्याने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करुन दिल्याचे औशाचे आगारप्रमुख शंकर स्वामी यांनी सांगितले.

उड्डाणपूलाचा विरोध ठरतोय जीवघेणा...रत्नागिरी-नागपूर आणि लातूर-उमरगा या दोन महामार्गावर येणाऱ्या औसा टी-पाँईंटवर नियोजित उड्डाणपूल होता. मात्र, काही लोकांनी त्यास विरोध केल्याने उड्डाणपूल वगळून महामार्गाचे काम पुर्ण झाले. औसा टी-पाँईंटवर सर्व्हिस रोड नसल्याने दररोज अपघात होत आहेत. आतापर्यंत ४० पेक्षा जास्त अपघात झाले असून, यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर