शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Latur: चाेरीतील बारा दुचाकींसह दोघांना लातूरमधून अटक, आठ गुन्ह्यांचा उलगडा

By राजकुमार जोंधळे | Updated: January 22, 2025 05:45 IST

Latur News: लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी करण्यात आलेल्या बारा दुचाकींसह दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. चौकशीत आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

- राजकुमार जाेंधळेलातूर - शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी करण्यात आलेल्या बारा दुचाकींसह दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. चौकशीत आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

पोलिसांनी सांगितले, लातूर शहर आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत वाहन चोरीसह इतर गुन्ह्यांचे प्रमाण अलीकडे वाढले असून, ग्रामीण भागातही दुचाकीच्या चोऱ्या होत आहेत. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. या आदेशानुसार स्थानिक पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा, वाहन चोरणाऱ्या टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने संशयित आरोपी श्रीरंग लक्ष्मण सारगे (वय ५०, रा. गव्हाण, ता. निलंगा, जि. लातूर), गोवर्धन व्यंकटी काळे (वय ३४, रा. अंबाजोगाई रोड, अहमदपूर, जि. लातूर) यांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता, चोरी केलेल्या बारा दुचाकी पोलिसांच्या हाती लागल्या. या दुचाकी लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरी केल्याचे ताब्यातील आरोपींनी सांगितले.

सहा ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त...लातुरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २ गुन्हे, विवेकानंद चौक २, गांधी चौक, निलंगा, अहमदपूर आणि चाकूर ठाण्यांच्या हद्दीतील प्रत्येकी एक गुन्हा असे आठ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांना अटक केली आहे.

स्थागुशाच्या या पथकाने दोघा आरोपींना उचलले...ही कारवाई स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, संजय कांबळे, राजेश कंचे, पुठ्ठेवाड, नकुल पाटील, सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, राहुल सोनकांबळे, युवराज गिरी, मोहन सुरवसे यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी